Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : प्रॉडक्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

Nashik News : प्रॉडक्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

शहरातील अमूल एजन्सीच्या गोडाऊनला (Godown) अचानक आग (Fire) लागल्याने या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी टळली मात्र ऐन दिवाळीच्या (Diwali) काळात गोडाऊनला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार(दि. ०१) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील राम मंदिरासमोरील (Ram Temple) व्यापारी मयूर पारख यांच्या मालकीचे अमोल कंपनी व इतर प्रॉडक्टचे होलसेल गोडाऊन असून या गोडाऊनला अचानकपणे आग लागली. आग लागली तेव्हा सदर गोडाऊन बंद असल्याने वरील पत्रावरून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघत आल्याचे पाहुन येथील आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मालक मयूर पारख यांना तुमच्या गोडाऊनला आग लागल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी नगरपरिषदेची (Municipal Council) अग्निशमन दलाची फायर बिग्रेड गाडी व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची अग्निशमन घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे नागेश जाधव, महिंद्रा कंपनीचे सेक्युरिटी ऑफिसर प्रतीक पांडे, फायर सेफ्टीचे अजय म्हसणे, सुपरवायझर जे. पी. रूपवते, सोनू करवर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केल्याने जवळपास एक तासानंतर आग आटोक्यात आणली.

हे देखील वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडने रचला इतिहास; भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका ३-० ने जिंकली

दरम्यान, गोडाऊनला आग लागलेल्या ठिकाणी आतमध्ये दहा ते बारा फ्रिज, कोल्ड्रिंक्स, अमोल कंपनीचे प्रॉडक्ट असलेले अमोल चीज बटर, तूप, आईस्क्रीम, रेड ब्लू कोल्ड्रिंक व ८ फ्रीज पूर्णपणे जळून खाक झाले असून वीस ते बावीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आग कशामुळे लागली याचा शोध पोलिसांकडून (Police) सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...