Thursday, July 23, 2026
HomeनाशिकNashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थानातील 'त्या' घटनेची दंडाधिकारी चौकशी सुरू; तीन...

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थानातील ‘त्या’ घटनेची दंडाधिकारी चौकशी सुरू; तीन दिवसांत तक्रारी सादर करण्याचे आवाहन

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) (दि.०१ मार्च) रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती, तक्रारी तसेच पुरावे ज्या नागरिक व भाविकांकडे असतील त्यांनी पुढील तीन दिवसांच्या आत सादर करावेत, असे आवाहन त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ.जी.व्ही. एस.पवनदत्ता यांनी केले आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत प्राथमिक चौकशी दरम्यान गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांना (Devotees) देण्यात येणार्‍या सुविधांबाबत काही बाबी पुढील सखोल तपासासाठी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे या संदर्भातील सर्वकष माहिती संकलित करण्यासाठी दंडाधिकारीय चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या चौकशीस पूरक ठरणारी कोणतीही माहिती, तक्रार किंवा संबंधित पुरावे (फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आदी) ज्या नागरिक तसेच भाविकांकडे असतील त्यांनी ती तीन दिवसांच्या आत सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने (Administration) केले आहे.

दरम्यान, सदरची माहिती ई-मेलद्वारे (E-Mail) sdoigatpuri.trimbak@gmail.com या पत्त्यावर पाठविता येईल. तसेच अधिक माहितीसाठी ९४२१५५०८५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही उपविभागीय दंडाधिकारी, त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभाग डाॅ. पवनदत्ता (Dr.Pawan Datta) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...