Saturday, July 4, 2026
Homeनाशिकसातपूर एमआयडीसी परिसरात दुचाकींचा अपघात; खुटवडनगर येथील कामगाराचा मृत्यू

सातपूर एमआयडीसी परिसरात दुचाकींचा अपघात; खुटवडनगर येथील कामगाराचा मृत्यू

सातपूर | प्रतिनिधी

औद्योगिक वसाहतीतील नाईस क्षेत्रात महात्मानगर लगत असलेल्या मारुती मंदिरासमोर दोन वाहनांच्या अपघातात ॲक्टिवा चालकाचा डोक्याला जबर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

याबाबत जागेवर असलेल्या नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती आयटीआय सिग्नलकडून कामगार नगरच्या दिशेने जात होते. भरधाव वेगात वाहने असल्यामुळे एकमेकांची वाहने धडकली. या घटनेत ऍक्टिवा चालकाचा जागीच मृत्यू झाला. असून स्पोर्ट बाईक चालकही गंभीर जखमी झाला आहे. जखमीस उपचारार्थ त्यांना सिक्स सिग्मा रुग्णालयात दाखल केले आहे.

या दुर्घटनेतील मयत ॲक्टीव्हा चालक शिंदे पळसे येथील कंपनीत कामाला असून खुटवड नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून जोडीदाराला घेण्यासाठी कामगार नगर त्या दिशेने जात होता.

याचवेळी संत कबीर नगरात राहणारा तरुण कामावरून परतत असताना महात्मा नगर लगतच्या औद्योगिक वसाहतीतील मारुती मंदिरासमोर हा अपघात झाला. सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने पुढील तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Igatpuri Rain : इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

0
इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri जुन महिना उलटूनही पावसाला सुरूवात झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने इगतपुरी...