Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमालेगाव तालुक्यात अफुच्या शेतावर पोलिसांची धाड; ५० लाखांची बोंडे जप्त

मालेगाव तालुक्यात अफुच्या शेतावर पोलिसांची धाड; ५० लाखांची बोंडे जप्त

नाशिक| प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील घाणेगाव येथे अफुच्या शेतीवर ग्रामिण पोलीस दलाने धाड टाकून सुमारे पन्नास लाख रूपयांचा एक हजार किलो अफु व त्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी रामेश्‍वर अंबादास संसारे, गोकुळ परशराम संसारे व निंबा चंदु शिल्लक (रा. सर्व घाणेगाव, ता. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील घाणेगाव शिवारात ३२ गुंठे क्षेत्रात अफुची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती.

त्यांच्या आदेशानुसार मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देविदास ढुमणे, उपनिरिक्षक पाटील, मोरे व त्यांच्या बारा जणांच्या पथकाने आज दुपारी घाणेगाव येथे धाड टाकली.

या ठिकाणी गावापासून अंतरावर असलेल्या शेतात ३२ गुंठे क्षेत्रावर अफुची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने सर्व अफु काढून गोण्यांमध्ये भरला. यानंतर पंचनामा करताना ९५० किलो वजन भरले असून याची बाजारभावात ४७ लाख ५४ हजार इतकी किंमत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले असून जिल्ह्यात कोठे असे धंदे आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या