Wednesday, February 4, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! अखेर गणेशोत्सवातील मंडप परवानगी शुल्क माफ; मंत्री गिरीश महाजन यांचे...

मोठी बातमी! अखेर गणेशोत्सवातील मंडप परवानगी शुल्क माफ; मंत्री गिरीश महाजन यांचे आयुक्तांना पत्र

नाशिक | प्रतिनिधी
येत्या 27 ऑगस्टपासून राज्यभरात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात विविध मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडप व इतर रचनांवर महानगरपालिका घेत असलेले परवानगी शुल्क यंदा माफ करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

जलसंपदा मंत्री (विहीर, तापी व कोकण खोरे विकास महाराष्ट्र) गिरीश महाजन यांनी याबाबतचे पत्र नाशिक महापालिका प्रशासनाला पाठविले आहे. गणेश मंडळांकडून वारंवार होत असलेल्या विनंत्या व मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

गणेशोत्सव हा सार्वजनिक भावनांचा उत्सव असल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मंडप व स्टेज परवानगी शुल्क रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

YouTube video player

हे ही वाचा: Nashik News: पिंपळगाव खांबमध्ये मध्यरात्री बिबट्या जेरबंद

यामुळे नाशिकसह राज्यभरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळणार असून गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि सुलभतेने साजरा होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....