Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik News : मोहदरी घाटात छोटा हत्ती वाहनाला आग; गाद्या, केबीन जळून...

Nashik News : मोहदरी घाटात छोटा हत्ती वाहनाला आग; गाद्या, केबीन जळून खाक

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) मोहदरी घाटात (Mohadari Ghat) आज (दि.६) रोजी दुपारच्या सुमारास छोटा हत्ती वाहनाला आग लागून वाहनातील गाद्या व केबीन पुर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी कि, छोटा हत्ती क्र. एम. एच. ०२ ई. आर. ६९६३ हा नाशिकहून (Nashik) काही गाद्या भरुन सिन्नरकडे येत होता. मोहदरी घाट चढत असताना अचानक वाहनाच्या पुढील बाजूला आग लागली. इंजिनमधून धुर निघत असल्याचे बघत चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर चालकाने वाहनातून बाहेर पडत तत्काळ नगरपरिषदेच्या अग्शिशमन विभागाला माहिती दिली.नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून माळेगाव एमआयडीसी अग्शिशमन विभागाला याबाबत माहिती दिली.

YouTube video player

मात्र, वाहन पुर्णपणे गाद्यांनी भरलेले असल्याने काही गाद्यांनीही पेट घेतला. अग्निशमनचा बंब घटनास्थळी पोहण्यापुव चालकाने वाहनातून काही गाद्या खाली ओढून काढल्या. मात्र, आगीने (Fire) रौद्ररुप धारण केल्यानंतर त्याला उरलेल्या गाद्या तशाच सोडाव्या लागल्या. एमआयडीसीचा बंब काही वेळातच घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत वाहनाच्या पुढील बाजूने व अर्धा गांद्यांनी मोठ्या प्रमाणावर पेट घेतला होता.

दरम्यान, अग्निशमनच्या जवानांनी अथक परिश्रम घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीने वाहनाची केबीन पुर्णपणे जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन विमोचक प्रमुख संदीप पाटील, भाऊसाहेब बागुल, यंत्र चालक सचिन पाटील, हेमराज चव्हाण, आकाश देसले, सागर पाटील, निलेश पवार, राहुल नवले यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....