Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सिंहस्थापूर्वी 'मिसिंग लिंक' साठी अधिक निधी द्या; महापौर आडकेंची...

Nashik News : सिंहस्थापूर्वी ‘मिसिंग लिंक’ साठी अधिक निधी द्या; महापौर आडकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील (Nashik City) वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्र्यंबकरोड व गंगापूररोडवरील ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. मुंबईत झालेल्या भेटीत महापौरांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा मांडत सिंहस्थासाठी आवश्यक रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने निधी देण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) लक्षात घेऊन राज्य शासनाने सिंहस्थ प्राधिकरणामार्फत शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी सुमारे साडेबाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांना जागेची उपलब्धता आणि निधीअभावी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक लक्षात घेता गंगापूररोड हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. बाह्य वाहनतळ, मध्य वाहनतळ आणि अंतर्गत वाहनतळ यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने त्याचा विस्तार आणि पूरक रस्त्यांची उभारणी आवश्यक असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले.

त्र्यंबकरोडवरील सुला चौक ते दत्त चौक तसेच अंबड लिंकरोड ही ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) भूसंपादनासह विकसित करण्यासाठी सुमारे ३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच एक्स्लो चौक, चुंचाळे, आशीर्वादनगर ते बेळगाव ढंगा या ‘मिसिंग लिंक’ रस्त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांची आवश्यक्ता आहे. मुंबईहून नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या या मार्गांवर २०१५ च्या कुंभमेळ्यावेळी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या कामांना तातडीने निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गंगापूररोडला समांतर रस्त्याची मागणी

गंगापूररोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेता गोदावरी नदीकाठावर समांतर रस्ता विकसित करण्याचीही मागणी महापौरांनी केली. प्रमोद महाजन उद्यान ते आसाराम बापू आश्रम या मार्गासाठी सुमारे ३२ कोटी तर आसाराम बापू आश्रम ते वृंदावन लॉन्सपर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...