Thursday, July 2, 2026
Homeनाशिकआरोग्य विद्यापीठात लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होणार – कुलगुरु डॉ. दिलीप...

आरोग्य विद्यापीठात लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होणार – कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा वर्धापन दिन साध्या पध्दतीने संपन्न

नाशिक : कोविड -19 विषाणूसारख्या आजाराला तोंड देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविणार सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

विद्यापीठाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यापीठ ध्वजारोहण मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळेस समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, सध्या कोव्हीड-19  विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला असून या आपत्कालिन परिस्थितीत काम करणारे सर्व डॉक्टर, प्राध्यापक, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अश्या परिस्थितीत रुग्णालयात सेवा पुरवितांना तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

या दृष्टीकोनातून विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. नामदार श्री. अमित देशमुख यांनी दिलेल्या आदेशान्वये विद्यापीठाकडून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल व वैद्यकीय तज्ज्ञांची समिती यांच्या समितीने पुढील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आरेखित केले आहेत.

विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थेटर टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन रेडिओ टेक्नोलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन डायलेसिस, सर्टिफिकेट कोर्स इन ई.सी.जी., सर्टिफिकेट कोर्स इन कॅथलॅब हे तांत्रिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म, सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टिफिकेट कोर्स इन डेंटल मेकॅनिक आदी एक किंवा दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र लातूर येथे लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या व्यक्तींना ’विद्यापीठ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यावर्षी वैद्यकीय विद्याशाखेतील डॉ. अरुण रा. महाले, डॉ. इंद्रप्रकाश रामभाऊजी गजभिये, डॉ. डी. आर. मुखेडकर, दंत विद्याशाखेत डॉ. शरद रामचंद्र कोकाटे, आयुर्वेद विद्याशाखेत वैद्य नारायण गांगल, होमिओपॅथी विद्याशाखेत डॉ. अरुण निलकंठराव भस्मे यांना विद्यापीठ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा यथोचित सन्मान लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...