Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकNashik News : गुरुपौर्णिमेनिमित्त मुस्लिम विद्यार्थिनीचा भावनिक संदेश व्हायरल; शिक्षिका आणि समाजासाठी...

Nashik News : गुरुपौर्णिमेनिमित्त मुस्लिम विद्यार्थिनीचा भावनिक संदेश व्हायरल; शिक्षिका आणि समाजासाठी दिल्या शुभेच्छा

नाशिक | फारुक पठाण | Nashik

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चाळीसगाव (Lasalgaon) येथील ग्रेस अकॅडमी, हिरापूर रोड येथे सातवीत शिकणारी जोया फारुख शेख या मुस्लिम (Muslim) चिमुकलीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिक्षकांना दिलेल्या संदेशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत दिलेल्या या भावनिक शुभेच्छांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

जोया ही चाळीसगावमधील गुणवंत आणि शिस्तप्रिय कुटुंबातील असून, तिचे वडील फारुख शेख हे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (Nashik District Superintendent of Police Office) लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तर फारुक शेख यांचे वडील शहाबुद्दीन शेख हे आयकर विभागात कर्मचारी होते. तर जोया शेख हिची आई अफसाना फारुख शेख या गृहिणी आहेत.

दरम्यान, अशा सुसंस्कृत आणि शिक्षित कुटुंबातील (Family) जोयाने दिलेला हा सद्भावनेचा संदेश समाजामध्ये धार्मिक एकतेचा संदेशही देतो. तिच्या या हृदयस्पर्शी भाषणाने अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये जोयाचे विशेष कौतुक होत असून, सोशल मीडियावर ती ‘Unity in Diversity’ चे प्रतीक म्हणून देखील पाहिली जात आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Accident News : कार-दुचाकीचा भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू,...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar तालुक्यातील अंबोली-वेळुंजे रस्त्यावरील (Amboli-Welunje Road) मोहनबाबा हागोटे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:१५ वाजता कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला....