सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungi Gad
सप्तशृंगीगड (Saptashrungi Gad) येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर बचाव पथकाला आणखी एक मृतदेह सापडल्याने या अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहचला असून, त्यांची नावे समोर आली आहेत.
हे देखील वाचा : Nashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू
कीर्ती पटेल (वय ५०) रसीला पटेल (वय ५०) विठ्ठल पटेल (वय ६५) लता पटेल (वय ६०) पचन पटेल (वय ६०) आणि मणिबेन पटेल (वय ६०) अशी मृतांची नावे असून, हे सर्वजण निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत (Pimpalgaon Baswant) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवाशी होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, आज (रविवारी) दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Darshan) जात असताना वाहन क्रमांक (एमएच १५ बीएन ०५५५) खोल दरीत कोसळल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरु केले. सध्या आपत्ती व्यवस्थापनाकडून दरीतून मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.




