Wednesday, September 2, 2026
HomeनाशिकNashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात कार दरीत कोसळली; पाच जणांचा...

Nashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungi Gad

- Advertisement -

सप्तशृंगीगड (Saptashrungi Gad) येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवाशी होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Darshan) जात असताना वाहन (एमएच १५ बीएन ०५५५) खोल दरीत कोसळून अपघात (Accident) झाला. तसेच अद्याप मृतदेहांची ओळख पटली नसून, मृतदेह दरीतून बाहेर काढले जात आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. घाटाच्या सरंक्षक भितींचे काही अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप आक्रमक; काळ्या फिती...

0
नाशिक | Nashik काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज (बुधवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून, ते काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या निवासी...