Saturday, April 25, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

मोठी बातमी! नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

नाशिक | Nashik

नाशिकचे जिल्हाधिकारी (Nashik Collector) जलज शर्मा (Jalaj Sharma) यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आधीच शर्मा यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

जलज शर्मा यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून आज (दि.०७) रोजी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) केल्या आहेत. यात शर्मा यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...