
मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर तुरुंगात असताना विष प्रयोग झाला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी ही शक्यता व्यक्त केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तर, याबाबत त्यांना काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सल्ला देत एक टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली आहे. याच मुद्द्यावरून आज शनिवारी (5 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत तुमच्यावर तुरुंगात विषप्रयोग झाला का? असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा ते बोलत होते.
दहा दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खालावलेल्या प्रकृतीविषयी चौकशी केली. राऊत म्हणाले, माझ्या आजाराची सुरुवात तुरुंगात असतानाच झाली हे माझ्या लक्षात आले होते. राहुल गांधींशी चर्चा करताना त्यांनी मला सांगितले की, आपण तुरुंगात असताना हे सरकार इतके क्रूर आहे की ते आपल्या लोकांच्या बाबतीत काहीही करू शकते. तुमच्यासारख्या माणसाला अचानक असा आजार का व्हावा?”
Nashik News: चांदशी रोडवर बॅरिकेड तोडून कार आत घुसली
जे लोक समाजासाठी झटत असतात, आंदोलने करतात, असे लोक तुरुंगात गेल्यावर त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. केवळ मीच नाही. अनेक लोक तुरुंगात गेल्यावर त्यांच्या जेवणात हे लोक विष मिसळू शकतात, असा अनेकांना संशय आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला सावध केले आहे, असे राऊत म्हणाले.
तुमच्या सारख्या माणसाला आजार व्हावा हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तुम्ही तत्काळ टेस्ट करून घ्या असे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे मी ती टेस्ट करणार आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. कारण, जे लोक समाजासाठी लढतात. आंदोलन करतात. लोकांसाठी आवाज उठवतात. तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. मीच नाही. अनेक लोक तुरुंगात असतात. त्यांच्या खाण्यापिण्यात हे लोक गडबड करू शकतात हा सर्वांना डाऊट आहे, असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
तुरुंगात असताना जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. मी तुरुंगातून आल्यावरच हा आजार सुरू झाला, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे आता ते ही टेस्ट नेमकी कधी करतात? आणि त्या टेस्टचा नेमका रिपोर्ट काय येतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राऊत यांच्या या थेट आणि गंभीर दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.




