नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad ) विविध विभागातंर्गत बांधकामे सुरू आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ( Financial Year) कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे. या वर्षातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, अपूर्ण कामे ही १५ मार्चपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे (Dr. Arjun Gunde) यांनी दिले.
वेळेत निधी खर्च व्हावा, यासाठी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी जिल्ह्यातील (District) सर्व शाखा अभियंता, उपअभियंता यांची बैठक घेत, विविध विभागातंर्गत सुरू असलेल्या बांधकामांचा आढावा त्यांनी घेतला. इतर सर्व मंजूर कामे ही वेळात पूर्ण करावीत, निधी अखर्चित रहाता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मार्च एण्डींगच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन निधी खर्चासाठी सरसावली आहे.
प्रशासनाने अंदाजपत्रकाची (Budget) तयारी सुरू केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण मंजूर झालेले कामे, त्यांची सद्यस्थिती, अपूर्ण कामे यांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा यावेळी झाला. प्रामुख्याने अंगणवाडी कामे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नवीन शाळा खोल्या, शाळा दुरूस्ती याचा कामनिहाय आढावा डॉ. गुंडे यांनी घेतला. काही मंजुर कामे संथगतीने सुरू असल्याचे निर्देशनास आले. त्यावर डॉ. गुंडे यांनी विचारणा करत अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान, ही कामे वेळात न झाल्यास निधी अखर्चित राहून तो शासन दरबारी जमा होणार आहे. त्यासाठी ही कामे वेळात पूर्ण करावीत असे आदेश डॉ. गुंडे यांनी यावेळी दिले. मार्च एण्डीगंच्या पार्श्वभूमीवर कामांची व बीले काढण्याची गर्दी असते. त्याकरिता १५ मार्च पूर्वीच कामे पूर्ण करून बिले टाकण्यात यावी, असे डॉ. गुंडे यांनी सांगितले.