Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिककरांना दिलासा; शहरातील वृक्षतोडीला 'या' तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची...

Nashik News : नाशिककरांना दिलासा; शहरातील वृक्षतोडीला ‘या’ तारखेपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे शहरातील तपोवनासह सर्वच भागातील झाडे महापालिकेकडून तोडली जात आहे. ही झाडे तोडण्याला पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी झाली असता हरित लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमधील (Nashik) सर्वच भागातील वृक्ष तोडीला राष्ट्रीय हरित लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच याबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाला २८ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील कुठलीही झाडे तोडता येणार नाहीत. लवादाच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीविरोधात लढा देणाऱ्या पर्यावरणप्रेमींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात

हरित लवादाने काय म्हटले?

नाशिक शहरात रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल आणि इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड प्रस्तावित आहे. यामध्ये अनेक पुरातन आणि डेरेदार वृक्षांचा समावेश असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापालिका प्रशासनाकडून वृक्षतोडीची प्रक्रिया राबवली जात असताना, पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप करत काही पर्यावरण संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हरित लवादाने नाशिकमधील वृक्षतोडीच्या सद्यस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत, पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे २८ एप्रिलपर्यंत कोणतीही नवीन वृक्षतोड करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका आणि संबंधित विभागांना या प्रकरणी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...