Tuesday, May 26, 2026
Homeक्राईमNashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा 'व्हायरस'; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा...

Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांची लाचखोरीची (Bribe) घटना ताजी असतानाच, आणखी एक भ्रष्ट चेहरा समोर आला आहे. हक्काच्या वेतनासाठी लढा देणाऱ्या शिक्षक दाम्पत्याकडून ‘टक्केवारी’ मागणाऱ्या आणि लेखा विभागाच्या त्रिकुटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ माजली असून, प्रशासकीय यंत्रणा केवळ ‘वसुली केंद्र’ बनली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : ‘सन्मानयुग’ च्या नावे ‘कलंकयुग’; एरंडेच्या ‘त्या’ क्लिप्समध्ये अनेक संसार पणाला

भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (वय ४८, गटशिक्षणाधिकारी), निलेश गिंबा भारती (वय ५०, प्राथमिक शिक्षक) व देवीप्रस शिक्षणाद चैत्राम पाटील (वय ५०, कनिष्ठ लेखा अधिकारी, जि.प. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील (Didnori Taluka) एका शिक्षक दाम्पत्याचे २००२ ते २०२६ या कालावधीतील ‘पेसा’ क्षेत्रातील वरिष्ठ वेतश्रेणीचे थकीत फरक देयक मंजूर झाले होते. सुमारे ६ लाख ५७ हजार रुपयांच्या या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि ते जिल्हा परिषद स्तरावर पाठवण्यासाठी संशयितांनी लाचेची मागणी केली होती.

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त

त्यात संशयित शिक्षक निलेश भारती याने स्वतः साठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बिलाच्या एकूण रकमेच्या १ ते ३ टक्के रकमेची मागणी केली. बिलाची प्रत जिल्हा परिषदेत सादर करण्यासाठी एक टके आणि त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यामार्फत काम करून घेण्यासाठी उर्वरित रक्कम, असा हा व्यवहार ठरला होता. गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण आणि कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद पाटील यांनी या लाचखोरीला केवळ संमतीच दिली नाही, तर त्यासाठी प्रोत्साहनही दिले, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

अशी झाली कारवाई

तक्रारदार शिक्षकाने कंटाळून नाशिक ‘एसीबी’कडे धाव घेतली. पडताळणीअंती, ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यावर, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच वैशाली ठाकरे यांना २० लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच घेताना त्यांच्याच दालनात अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच शिक्षण विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

हे देखील वाचा : Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

ताज्या बातम्या

MLC Election : विधान परिषदेसाठी 9 जणांनी नेले 16 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काल 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी...