Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : गजू घोडके यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन; मंत्रालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा

Video : गजू घोडके यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन; मंत्रालयासमोर आत्मदहनाचा दिला इशारा

नाशिक |Nashik

येथील सुवर्णकार व्यापारी विजय बिरारी यांच्या संंशयास्पद मृत्युनंतर गेली दोन वर्ष तपास होऊनही काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांंनी आजपासून नाशिकमध्ये अन्नत्याग आंंदोलन सुरु केले आहे. येत्या 30 जानेवरीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांनी मंत्रालयासमोर आंत्मदहनाचा इशारा दिला आहे….

- Advertisement -

यााबाबत अधिक माहीती अशी की, गेल्या दोन वर्षापुर्वी शहर पोलिसांनी चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशंयावरुन बिरारी यांना ताब्यात घेतले होते.

त्यांंची शासकीय विश्रामगृह येथेे कडेकोट बंदोबस्तात चौकशी सुरु असताना ते चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मरण पावले. या घटनेचे तिव्र पडसाद त्यावेळी शहरात उमटल होते.

तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांंनी हा तपास राज्य गुन्हे् अन्वेषण (सीआयडी)विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन वर्ष होऊनही सीआयडीचा तपासच सुरु आहे.

या प्रश्नात घोडके यांनी समाज बांधवाला न्याय मिळावा म्हणुन सातत्याने माहीतीच्या अधिकारात तपासाची माहिती मागितली.

मात्र कधी करोना तर कधी तपास सुुरु आहे. अशी उत्तरे देऊन पोलिस त्यांंच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत आहेत. म्हणुनच आता घोडके यांनी सुवर्णकारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा केला आहे.

यापूर्वी ओबीसीआरक्षणाच्या मुद्यावर घोडके यानी मंत्रालयासमोर अत्मदहनाचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा त्यांनी बिरारी कुटुंंबीयांसाठी निर्णायक लढा देण्याचा इशारा दिला आहे. त्याची सुरवात आज पासुन अ़न्न त्यागाने झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बिरारी यांच्या मृत्युस कारणीभात असणार्‍याना तीस तारखेपर्यंत अटक न केल्यास मी आत्मदहन करत आहे .आजपासून अन्नत्याग करत आहे आपण सर्वांना भावनिक आवाहन करता की, बिरारी कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आपण बिरारी कुटुंबाला पाठिंबा द्यावा, मी माझ्या निवासस्थानी तीस तारखेपर्यंत अन्नत्याग करत आहे.

गजु घोडेके (ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)

- Advertisment -

ताज्या बातम्या