Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याविजेचा धक्का बसल्याने लहान भावाचा मृत्यू; मोठा गंभीर

विजेचा धक्का बसल्याने लहान भावाचा मृत्यू; मोठा गंभीर

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिकमध्ये विजेचा धक्का लागुन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी वाचविण्यासाठी गेलेल्या भावाला देखील विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला सून त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शिवशक्ती चौक येथील नवजीवन कॉलेज शेजारी घडली

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, सिडकोतील शिवशक्ती चौकात नानाजी जगताप कुटुंबासमवेत राहतात. या भागात ड्रेनेजचे काम सुरू होते.

यावेळी जेसीबीचा धक्का लागल्याने भूमीगत वायर तुटली होती. आज (दि २९) सकाळी धीरज जगताप (वय २५) हा पाणी मारत असताना विदयुत तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

याचवेळी त्याचा भाऊ अमोल जगताप (वय २८) त्याला वाचवायला गेला असता, त्यालाही विजेचा धक्का बसल्याने तो या घटनेत जखमी झाला. अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या