Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : महिलांनो सक्षम व्हा! भीती आणि लाज वाटते म्हणून गप्प बसू...

Video : महिलांनो सक्षम व्हा! भीती आणि लाज वाटते म्हणून गप्प बसू नका; नाशिक पोलीस आयोजित परिसंवादात आवाहन

नाशिक | प्रतिनिधी

आज नाशिक शहर पोलिसांकडून “महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध” या माहितीपूर्ण व प्रेरणादायी परिसंवादाचे आयोजन आज हॉटेल ताज येथे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात अभिनेत्री राणी मुखर्जी, मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते आणि लेखक निर्माता प्रवीण तरडे, नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आयपीएस अधिकारी आणि पद्दुचेरीच्या नायब राजपाल किरण बेदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १० ए आणि ६ पी यावर विशेष स्लाईडच्या माध्यमांतून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील महाविद्यालयातील मुलींची मोठी गर्दी या कार्यक्रमाला होती.

देशातल्या कोणत्याच कोपऱ्यात आज महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. ‘महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. फक्त प्रत्येक स्त्रीने ती ओळण्याची गरज आहे. पोलीस सगळीकडे उपस्थित राहू शकत नाहीत.

त्यामुळे आपल्याला आपलं संरक्षण करता आले पाहिजे. महिला ही दुर्गेचे रूप असल्याचेही म्हटले आहे. शिवाय ती प्रत्येक महिलेला ‘शिवानी रॉय’सारखे जगायला सांगते आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या राणीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटात ती एका निर्भीड शिवानी रॉय नावाच्या पोलिसांच्या भूमिकेत झळकली.  ‘कोणी अत्याचार करत असेल, तर त्याच ठिकाणी त्याला त्याची जागा दाखवा असे राणी यावेळी म्हणाली.

‘जे घडत आहे ते सांगायला लाजू नका किंवा घाबरू नका. भीती आणि लाज वाटते म्हणून गप्प बसू नका. आता वेळ गप्प बसण्याची नाही, तर निर्भीडपणे आवाज बुलंद करण्याची वेळ आहे.’ त्याशिवाय मार्ग निघणार नसल्याचेही ती म्हणाली.

परिसंवाद कार्यक्रमात राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी, पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.

मुक्ता बर्वे म्हणाल्या…

तोंडात ३२ दात असतात, ३२ दातातील एखादा दात किडतो तेव्हा त्यावर शस्रक्रिया करावी लागते. महिला सुरक्षा बाबतीतही असेच होत आहे. सगळेच पुरुष चुकीचे वागतात असे नाही, पण जो कुणी एक असतो त्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला अद्दल घडली तर तो पुन्हा त्या मार्गी जाणार नाही. आपली संस्कृती पुरुषप्रदान संस्कृती म्हणून परिचित आहे, पण तसे राहिले नाही. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

पुरुषांचा त्यांना पाठींबा मिळाला नसता तर कदाचित असे घडलेले बघायला मिळाले नसते. त्यामुळे पुरुषांनीदेखील महिलांच्या कामातील हिस्सा वाटून घेतला पाहिजे. महिलांना चूल आणि मुल पुरता मर्यादित न ठेवता त्यांना सन्मानाने जगविले पाहिजे. आदर, मान सन्मान द्यायला हवा; महिलांना घरातून सन्मान तरच बाहेर त्यांचा सन्मान होईल त्यांना चांगली वागणूक मिळेल असे मत मुक्ता बर्वे यांनी मांडले.

नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस…

महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांनी अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर एखादी घटना घडलीच तर मदतीचा हात मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी महिलांनी सर्वगुणसंपन्न असल पाहिजे. कुठलीही घटना सांगून येत नाही, संकट आल्यानंतर सक्षमपणे संकटाला सामोरे जाऊन प्रतिकार केला पाहिजे. स्वसंरक्षणाचे धडे नाशिकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये दिले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या