Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : समृद्धीवर ९६ किमीच्या पट्ट्यात पेट्रोलिंग; लुटीच्या घटनांनंतर ग्रामीण पाेलिसांची...

Nashik News : समृद्धीवर ९६ किमीच्या पट्ट्यात पेट्रोलिंग; लुटीच्या घटनांनंतर ग्रामीण पाेलिसांची विशेष उपाययाेजना

३० अमलदारांची नियुक्ती

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) सिन्नर आणि वावी हद्दीत एकाच रात्री घडलेल्या ‘टायर फोडा आणि लुटा’ या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दलाने (Rural Police Force) महामार्गाच्या सुरक्षेची व्यूहरचना बदलली आहे. गुन्हेगारांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी ९६ किलोमीटरच्या पट्ट्यात २४ तास पॅट्रोलिंग शिल्ड तैनात केले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा लागू केला आहे.

- Advertisement -

​जिल्ह्यात वावी, सिन्नर, घोटी आणि इगतपुरी या चार पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीतून समृद्धी महामार्गाचा ९६ किलोमीटरचा टप्पा जातो. निर्जन रस्ते आणि वेगाचा फायदा घेऊन गुन्हेगारी टोळ्या या भागात सक्रिय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ​घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर उतरून परिस्थितीची आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

संशयित टोळीचा (Suspect Gang) तपास वेगाने सुरू असल्याचे सांगत त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून डाॅ. स्वामी हे स्वतः मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत आहे. तैनात करण्यात आलेल्या नवीन गस्ती पथकांमुळे प्रवाशांनी भीती न बाळगता निर्धास्त प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

नवीन सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

-​ ६ विशेष वाहने अन् ३० जवान
– संपूर्ण ९६ किमीच्या अंतरावर विशेष पोलीस वाहने
– गस्ती पथकांसाठी महामार्गावर विशिष्ट टप्पे
– नेमून दिलेल्या टप्प्यातच २४ तास फिरते राहणे बंधनकारक
– या रचनेमुळे पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचेल.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...