नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना सोमवारी सायंकाळी त्यांच्या घराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघाताचे (Accident) चित्रिकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला होता. त्याला मंगळवारी रात्री अटक (Arrested) करण्यात आली.
मारुती सेलेरियो (एमएच १५ केके ३४९१) या कारचा चालक रामनाथ घिसाई चौहान (४२, मूळ राहणार सुब्रहा, पोस्ट बरदिया कुंवर, ता. हारेया, जिल्हा बस्ती, हल्ली रा. सर्वे नंबर ५२/७१ मखमलाबाद, शांतीनगर म्हसरूळ, नाशिक) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. सोमवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निर्मला गावित या त्यांच्या नातवाला घराबाहेर फेरफटका मारायला निघाल्या होत्या. त्यांच्या घराजवळच असलेल्या कॉलनी रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने (Vehicle) त्यांना मागून जोरदार धडक दिली.
दरम्यान, यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या, सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या लहान नातवाला काही दुखापत झाली नाही. अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. तर गावित यांना तात्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा सेलेरियो यास अटक केली. याप्रकरणी चालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. तर अपघाताची माहिती गावित यांच्या नातेवाईकांसह समर्थक तसेच कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
घात की अपघात?
सीसीटीव्ही फुटेजनुसार माजी आ. गावित या रस्त्याच्या कडेने पायी चालत होत्या. दरम्यान, त्यांच्या समोरून शाळेचे वाहन आले यावेळी त्यांच्या मागून येणाऱ्या चारचाकी चालकाने त्याच्या गाडीचा वेग कमी केला होता. शाळेचे वाहन निघून गेल्यानंतर अचानक त्याचा वेग वाढला कसा? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस करता तरी काय?
अपघाताला २४ तास उलटून गेले तरी गावित यांना उडवून फरार झालेला चारचाकी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे पोलीस नक्की करता तरी काय असा सवाल गावित यांच्या कन्या नयना गावित यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता.





