Monday, May 4, 2026
HomeनाशिकNashik Rangpanchami : रंगांच्या उधळणीत नाशिक रंगले; डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली

Nashik Rangpanchami : रंगांच्या उधळणीत नाशिक रंगले; डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली

नाशिक | Nashik

आज (रविवारी) रंगपंचमी असून, राज्यभरात उत्साहात साजरी केली जात आहे. धूलिवंदनापासून सुरु होणार्‍या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या (Rangpanchami) दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या पाचव्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण असून, तो रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा केला जातो. याच पाश्वर्भूमीवर आज नाशिकसह राज्यभर विविध रंगांची उधळण करत रंगोत्सव करण्यात येत आहे.

- Advertisement -

नाशिकची (Nashik) ऐतिहासिक ओळख असलेला आणि पेशवे काळापासून जपलेला रहाड (Rahad) रंगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शहरात तब्बल नऊ राहडी असून आज दुपारच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून या रहाडींमध्ये उडी घेऊन रंगपंचमीस सुरुवात झाली. यावेळी रंग, पाणी आणि जल्लोषात तरुणाई विविध गाण्यांवर डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आली.

तसेच शहरातील विविध भागांत नागरिकांनी एकमेकांना रंग लावत, पाण्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वांनी रंगांच्या सरींमध्ये न्हाऊन निघत रंगपंचमीचा आनंद लुटला. जुने नाशिक, गोदाकाठ परिसर, पंचवटी, गंगापूर रोड (Gangapur Road) तसेच शहरातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात रंगांची उधळण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी तरुणांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत उत्सवाची रंगत आणखी वाढवली.

दरम्यान, शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस (Police) प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय रहाडींवर सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तसेच रहाड आणि शॉवर डान्ससाठी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला असून, रंगपंचमीच्या वेळी नाशिक पोलीस, स्वयंसेवक, दामिनी पथक यांचे गस्त आहे.

कोणत्या राहाडीत कुठला रंग?

यंदा खुल्या करण्यात आलेल्या राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, रानी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी आणि दंडे हनुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा आहे. रंगपंचमीच्या सात ते आठ दिवस आधी या रहाडी उकरण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यातील सर्व माती बाहेर काढून रहाडींची स्वच्छता केली गेली. त्यानंतर या रहाडींना रंगरंगोटी करण्यात आली. यानंतर यां रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले. सर्व रंग विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासून तयार केले जातात. हजारो नागरिक या रहाडींमध्ये डुंबतात. रहाडीत जी उडी मारली जाते, तिला ‘धप्पा’ म्हटले जाते.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...