Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : शिस्तीच्या धड्यानंतरही रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरूच

Nashik News : शिस्तीच्या धड्यानंतरही रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरूच

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

येथील रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरातील (Nashik Road Railway Station and Bus Stand) रिक्षाचालकांना गेल्या सात ते आठ दिवसांपासून नाशिकरोड पोलीस (Nashik Road Police) तसेच आरटीओ यांनी शिस्तीचे धडे दिले. या धड्यांचे पालन काही तासांसाठी करण्यात आले. कारण पुन्हा बेशिस्तपणा सुरूच असल्याने प्रवासी व नागरिक त्रस्तच आहेत.

- Advertisement -

आगामी सिंहस्थाच्या (Simhastha) पार्श्वभूमीवर रेल्वेने देशभरातून भाविक येणार आहेत. भाविकांना बाहेर जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच पोलिसांनी (Police) रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरातील रिक्षांच्या थांब्यावर या ठिकाणी उपाययोजना सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांना पोलिसांकडून शिस्तीचे धडे दिले जात आहेत. या शिस्तीच्या धड्याचा परिणाम काही तासांपुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player

पोलिसांनी या भागात आतापर्यंत अनेक रिक्षाचालकांवर (Rickshaw Drivers) दंडात्मक कारवाई करून काही रिक्षाचालकांच्या रिक्षाही जप्त केल्या आहेत. परिणामी त्यानंतर थोडासा परिणाम रिक्षाचालकांवर झाला आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक सध्या युनिफॉर्म घालून तसेच बिल्ला लावून व्यवसाय करत आहेत. मात्र असे असले तरी काही मर्यादित तासांसाठी हा परिणाम दिसत आहे. मात्र ज्यावेळेस एखादी रेल्वेगाडी येते, त्यावेळी अनेक रिक्षाचालक हे प्रवासी आपल्या रिक्षात कसे बसतील, यासाठी आडव्या रिक्षा लावून प्रवाशांना आपल्या रिक्षामध्ये बसण्यासाठी बळजबरी करताना दिसत आहे तर ज्यावेळी बस बाहेर गावावरून आल्यानंतर रिक्षाचालक थेट बसस्थानक परिसरातच चकरा मारून प्रवासी शोधत असतात.

दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरातील काही रिक्षाचालक लाईनमध्ये उभे असतात. मात्र काही रिक्षाचालक नगरकर पेट्रोल पंपासमोर भर रस्त्यावर रिक्षा लावून प्रवाशांना बसण्यासाठी बळजबरी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. कायमस्वरूपी जर रिक्षाचालकांना या ठिकाणी शिस्त लावायची असेल तर दोन वाहतूक पोलीस कायम असणे आवश्यक आहे, तरच रिक्षाचालकांचा मुजोरीपणा थांबेल व त्यांना शिस्तीचे धडे बसतील.

पोलीस प्रशासनाचे अभिनंदन

रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातही रिक्षाचालकांची ‘दादागिरी’ मोठ्या प्रमाणावर वाढली होती. प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणे, रांगेचे उल्लंघन करणे, तसेच काही रिक्षाचालकांकडून ऑनलाइन टॅक्सी सेवांच्या चालकांशी वाद घालणे अशी अनेक प्रकरणे समोर आली. शहरातील ही कारवाई हे शहर पोलीस प्रशासनाचे स्वागतार्ह पाऊल आहे.

विवेक गामणे, नाशिक

द्वारका परिसरात मुजोरी

शहर वाहतूक पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे स्वागत. द्वारका परिसरातील काही रिक्षाचालकांची मुजोरी सध्या वाढली आहे. महिला प्रवासी रिक्षात बसण्यासाठी आल्या असता किंवा रिक्षाजवळ दुसऱ्या रिक्षांची वाट पाहत उभ्या राहिल्या असता शिवीगाळ करणे, सिगारेट पिणे, धुराचे वलय सोडणे, अद्वातद्गा बोलणे आदी प्रकार ठराविक रिक्षाचालक करतात. यामुळे महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते.

दिलीप सूर्यवंशी, नाशिक

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...