Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Yeola News : दरोडेखोरांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

Nashik Yeola News : दरोडेखोरांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

नगरसूल | वार्ताहर | Nagarsul

येवला तालुक्यात (Yeola Taluka) गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी व दरोडेखोरांनी अक्षरशःधुमाकूळ घातला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील कोळगाव (Kolgaon) येथे दरोड्याखरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून प्रतिकार करणाऱ्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित

कोळगाव येथे चोरी (Theft) करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी गाडेकर वस्ती येथे दरोडा टाकून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रतिकार करणारे शेतकरी (Farmer) कारभारी गाडेकर (वय ७५) यांना दरडोखोरांनी जबर मारहाण केली असून या घटनेत त्यांना गंभीर इजा झाल्या आहेत. यानंतर सकाळी त्यांना पुढील उपचारासाठी येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस

दरम्यान, ही घटना येवला तालुका पोलिसांना (Yeola Taluka Police) समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली.यानंतर तालुक्यात नाकाबंदी केली असून श्वान पथकाला पाचरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...