नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर हद्दीत (Gangapur Area) झालेला मद्यपि तरुणाईचा राडा गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना (Senior Police Inspector) ‘कंट्रोल ड्युटी’ च्या स्वस्पात भोवला असतानाच आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक योनी अंबडच्या वरिष्ठ निरीक्षकांना त्याच पोलीस ठाण्यात (Police Station) दुय्यम निरीक्षकपदी नेमले आहे. अंबड हद्दीत भरदिवसा २४ लाखांच्या जबरी सुवर्ण चोरीच्या घटनेनंतर हा बदल करण्यात आला असून वाहतूक युनिट एकचे निरीक्षक राकेश हाडे हे अंबड पोलीस ठाण्याचे नवे इन्वार्ज असतील.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी सराफ दुकानात शस्त्रधा-यांनी जबरी चोरी केल्याने पोलीस निरीक्षकांसह हद्दीतील गस्त व पोलिसिंग संदर्भात जाब विचारून पोलीस आयुक्तांनी ‘प्रभारी’ निरीक्षकांना दणका दिला आहे. त्यातच या जबरी चोरीनंतराचा फटका गुन्हेशाखा युनिट दोनचे ‘प्रभारी’ विद्यासागर श्रीमनवार यांनाही बसला असून त्यांची नियुक्ती तत्काळ वाहतूक शाखा क्रमांक एकमध्ये करण्यात आली आहे. सोबतच, गुहेशाखा युनिट एकचे (Crime Branch Unit One) सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर हे युनिट दोनचे ‘प्रभारी’ असणार आहेत. अंबड पालीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.१७) दुपारी एका सराफ दुकानात तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून चोवीस लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर अंबड पोलिस, गुन्हे शोध पथकांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली, गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकारी-कर्मचा-यांनी संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेमुळे मंगळवारी (दि. १८) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह पथकांच्या वरिष्ठ निरीक्षकांची कानउघाडणी केली. यासह पोलिस आयुक्तांनी अंबडच्या प्रभारी निरीक्षकांना त्याच पोलिस ठाण्यातच ‘दुय्यम’ पदावर काम करण्याचे आदेश दिले. तर वाहतूक युनिट एकचे निरीक्षक राकेश हाडे यांना अंबडचे प्रभारी’ करण्यात आले. दरम्यान, गंगापूर रस्त्यावरील दहा दिवसांपूर्वी मद्यधुंदावस्थेत तरुणांनी धिंगाणा केल्यावर गंगापूरचे तत्कालीन ‘प्रभारी’ सुशिल जुमडे यांना निक्षण कक्षात नेमून तेथील ‘दुध्यम’ निरीक्षक जम्वेंद्रसिंग राजपूत यांना ‘प्रभारी’ करण्यात आले आहे. त्यामुळे हद्दीत गुन्हेगारीसह अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश सर्वच निरीक्षकांना पोलीस आयुक्तांनी तिघा निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करून दिला आहे.