Saturday, February 14, 2026
HomeनाशिकMalegaon Municipal Corporation : उपमहापौर दालनात टिपू सुलतान; मालेगावी तैलचित्र हटवण्यासाठी...

Malegaon Municipal Corporation : उपमहापौर दालनात टिपू सुलतान; मालेगावी तैलचित्र हटवण्यासाठी हिंदुत्ववादींसह शिवसेना आक्रमक

मालेगाव | प्रतिनिधी | Malegon

येथील भवनातील महानगरपालिका उपमहापौर (Deputy Mayor) शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात भिंतीवर टिपू सुल-तान यांचे तैलचित्र लावण्यात आल्याने शहरातील हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. टिपू सुलतानचे तैलचित्र तेथून हटविण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आयुक्त रविंद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -

दरम्यान, टिपू सुलतान (Tipu Sultan) यांना केंद्र शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्यात आल्याने तसेच त्यांच्या देश-सेवेचा आदर करण्यासाठी हे छायाचित्र आपल्या दालनात कार्यकर्त्यांनी लावले असल्याचा पवित्रा उपमहापौर शाने हिंद यांनी घेतल्याने टिपू सुलतान तैलचित्राचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

YouTube video player

गेल्या दोन दिवसापूर्वी महापौर व उपमहापौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. त्यानंतर दोघांना स्वतंत्र दालन देण्यात आले आहेत. उपमहापौर झाने-हिंद यांच्या कार्यालयात शहरासाठी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या टिपू सुलतान यांचे तैलचित्र लावण्यात आल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे शहरात पसरली. यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले.

तर सायंकाळी शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख संजय दुसाने, माजी उपमहापौर नगरसेवक निलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, नगरसेवक दिनेश ठाकरे, विनोद वाघ यांनी शिवसेना कार्यकर्त्यासह तातडीने महापालिका गाठत आयुक्त जाधव यांना याचा जाब विचारला. शिवसेना नगरसेवकांनी हे वादग्रस्त छायाचित्र तातडीने हटविण्याचा आग्रह आयुक्तांकडे धरला. मालेगाव शहराचे वातावरण कलुषित करण्यासाठी जाणूनबुजून हा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला.

शिवसेना म्हणते जुलमी राजा

टिपू सुलतानची प्रतिमा एक जुलमी राजा म्हणून आहे. त्यांनी आपले राज्य वाचविण्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. त्याने हिंदूची कत्तल केली. तो आदर्श राजा वा स्वातंत्र्यसैनिक होऊ शकत नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगून हे वादग्रस्त छायाचित्र तातडीने हटविण्याची मागणी केली. तसेच हा फोटो हटवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

उपमहापौर म्हणतात क्रांतिकारी !

आपण समाजवादी विचारधारेचे आहोत. माझे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रेसर होते. टिपू सुलतान हे थोर स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांची प्रतिमा आपणास कार्यकर्त्यांनी भेट दिली. त्याचा आदर राखून ही प्रतिमा दालनात लावण्यात आली आहे. मालेगावचा सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपल्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे. मात्र, यावरून विनाकारण वाद घातला जात असल्याचे उपमहापौर शानेहिंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या

Sarvamat Shopping Expo : दुसऱ्या दिवशी दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोला ग्राहकांचा...

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) गुरुवार दि. १२ फेब्रुवारी पासून येथील थत्ते मैदानात सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो २०२६ ला काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तालुक्यातील व शहरातील...