Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या रणरागिणींचे 'माझं कुंकू, माझा देश'आंदोलन; दिल्या...

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या रणरागिणींचे ‘माझं कुंकू, माझा देश’आंदोलन; दिल्या ‘या’ घोषणा

नाशिक | Nashik

आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धेत आज (रविवारी) सायंकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena UBT) या सामन्याला विरोध दर्शवत पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणार्‍या मोदी सरकारविरोधात ‘माझं कुंकू माझा देश’ या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिलांनी (Women) आज (रविवारी) रस्त्यावर उतरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत आंदोलन (Agitation) केले. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांच्या हाकेला साद घालत शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडीचे वतीने शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नाशिक येथे मोदी सरकारचा निषेध नोंदवून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच मोदी सरकार (Modi Government) हाय.हाय ,पाकिस्तान मुर्दाबाद, जवान मरतो सीमेवर, मोदी जगतो बिर्यानीवर, हामारा सिंदूर-हमारा देश, शिवसेना जिदांबाद, नही चलेगी नही चंलेगी दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा या महिलांकडून देण्यात आल्या. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता.यावेळी बीसीसीआयचे आध्यक्ष जय शहा यांच्या प्रतिमेस बांगड्याचा हार घालून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. सौभाग्याचे लेणं मोदींना पाठवून निषेध नोंदवणार आहोत, असेही या महिलांनी सांगितले.

दरम्यान, या आंदोलनात शिवसेना कोअर कमिटी सदस्या भारती ताजनपूरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, जिल्हा समन्वयक कीर्ती जवखेडकर, उपजिल्हा संघाटक शोभा दोंदे, फैमिदा रंगरेज, शोभा दिवे, युवतीसेना आधिकारी योगिता गायकवाड, मनिषा हेकरे, महानगर संघटक रंजना थोरवे, सुवर्णा काळूगे,शोभा वाल्डे, शोभा पवार, महानगर समन्वयक मंदा गवळी,उषा गायखे,विभाग संघटक ज्योति गोडसे, ज्योती, कुमावत शिवसेना महिला आघाडी महानगर पदाधिकारी विठाबाई पगार, शारदा दोंदे, माधुरी पाटील, अश्विनी मते,कविता सरोदे आदींसह शेकडो महिला पदाधिकारी सहभागी झाल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पुनर्परीक्षेसाठी प्रशासन टाईट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत नगरला आज रविवार, (दि. 21) 12 परीक्षा केंद्रांवर नीट 2026 पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 5...