Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : आदिवासी शेतकऱ्यांना अर्थार्जनाचा स्त्रोत; स्ट्रॉबेरी बाजारात दाखल

Nashik News : आदिवासी शेतकऱ्यांना अर्थार्जनाचा स्त्रोत; स्ट्रॉबेरी बाजारात दाखल

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

लाल-गुलाबी रंगाची, गोड आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा (Strawberry ) हंगाम वाढत्या थंडीबरोबरच (Cold) बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तशृंगीगड-वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबट-गोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी सप्तशृंगीगड-सापुतारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविक व पर्यटकांना मोहित करत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Winter News : निफाडचा पारा सात अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता

सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली शिंदे, हतगड, बोरगाव, घागबारी, लिंगामा, पळसन, ठाणापाडा इत्यादी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा इत्यादी गावांतील आदिवासी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीथ, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह (Crop) आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहेत. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे या भागात सात-आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.

हे देखील वाचा : Nashik Assembly Elections : २२ हजार ७१९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

विंटर, एस.ए. कॅमेर ओझा, नादीला, आर-२, आर-१ तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभीया यासह कमी दिवसांत लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी (Farmer) प्रामुख्याने महाबळेश्वर येथून १५ ते २५ रुपयास एक या दराने आणतात. नगदी पीक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात थोड्याफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाजदा येथे पाठवतात. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यावसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करतात. बहुतांशी शेतकरी हे स्वतःच स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरून वणी, नांदी, सप्तशृंगीगड, सापुतारा रस्त्यावरही ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारून स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहेत. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा : नाशकात उभारणार रामकाळ पथ; प्रकल्पासाठी केंद्राकडून ९९.१४ कोटी मंजूर

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यात असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे.

धर्मराज महाले, पळसन

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...