पालखेड मिरचिचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche
निफाड तालुक्यात (Niphad Taluka) थंडीचा मुक्काम दिवसेंदिवस वाढत असून आज शनिवार (दि.३०) रोजी सकाळी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा (Mercury ) सात अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.
निफाड तालुक्यात दरवर्षी पारा घसरत असतो, यावर्षी चालु हंगामात सात अंशावर (Degrees) पारा घसरण्याची नीचांकी नोंद झाली आहे. त्यामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबणार आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला (Grapes) कडाक्याच्या थंडीमुळे तडे जाण्याचा धोका आहे. घसरते तापमान हे द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढवत आहे.
हे देखील वाचा : Nashik Winter News : नाशकात हंगामातील नीचांकी तापमान
कडाक्याच्या थंडीपासून (Cold) द्राक्ष मालाची निगा राखण्यासाठी आवश्यकतेनुसार द्राक्ष बागाईतदारांनी पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनने पाणी द्यावे. शिवाय द्राक्ष बागांत शेकोटी पेटवुन धुराद्वारे उष्णता निर्माण करावी अशी महत्वपूर्ण काळजी द्राक्ष बागाईतदारांनी या नैसर्गिक संकटापासुन द्राक्षमाल वाचविण्यासाठी घ्यावी असे अवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले आहे. तर गहु, हरभरा या पिकांसाठी ही थंडी पोषक मानली जात आहे.