Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; टाटा नेक्सन EV कार...

Nashik News : समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; टाटा नेक्सन EV कार जळून खाक

सिन्नर | Sinnar

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) सिन्नरहून शिर्डीकडे (Sinnar to Shirdi) जाणाऱ्या टाटा नेक्सन इव्ही कारला (EV Car) अचानक आग लागल्याची घटना आज (बुधवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कांदळवाडी शिवाराजवळ घडली. काही क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश प्रकाश घुगे व विजय गणेश गीते हे सिन्नरहून शिर्डीकडे (Shirdi) जात असताना त्यांच्या एमएच १५ एचवाय ५५६३ या क्रमांकांच्या टाटा नेक्सन ईव्ही कारमधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. यानंतर काही क्षणांतच वाहनाला भीषण आग लागली. प्रसंगावधान राखत दोघांनी तत्काळ कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासन (Police Administration and Highway Administration) तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर (Trafic) परिणाम झाला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर…; शिंदे गटाच्या नेत्याचा मनोज...

0
धाराशिव । Dharashiv मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण...