Sunday, November 22, 2026
Homeक्राईमNashik News : शिक्षक नेते प्रकाश सोनवणे यांची गळफास घेऊन आत्महत्या; कारण...

Nashik News : शिक्षक नेते प्रकाश सोनवणे यांची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

नाशिक | Nashik

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स सोसायटीचे (एनडीएसटी) माजी चेअरमन तथा ज्येष्ठ शिक्षक नेते प्रकाश लीला सोनवणे (वय ६५) (Prakash Sonawane ) यांनी बुधवारी (दि. ३०) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे शिक्षण व सहकार वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सोनवणे हे मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरातील ‘प्रसन्न’ बंगल्यात वास्तव्यास होते. बुधवारी ( दि. ३०) दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या मोकळ्या जागेत लोखंडी कडीला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ते बेशुद्ध आढळून आल्यानंतर त्यांना महेंद्र पाटील यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. एनडीएसटीच्या (NDST) माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यात आणि संघटनात्मक बांधणीत सोनवणे यांचा वाटा राहिला आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र धक्का बसला असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हवालदार डांगरे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...