Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : मतदानाआधीच काळानं गाठलं; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने...

Nashik News : मतदानाआधीच काळानं गाठलं; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

येथील नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच काल (सोमवारी) रात्री एक दुःखद घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) उमेदवार नितीन वाघमारे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नितीन वाघमारे (Nitin Waghmare) यांनी प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली होती. मात्र, रात्री झोपेत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

YouTube video player

निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह, पक्षाचा प्रचार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत शोककळा पसरली आहे. वाघमारे यांच्या निधनाने वार्ड प्रभाग क्रमांक १० अ मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनमाडमध्ये (Manmad) थेट नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकांच्या ३३ जागांसाठी तब्बल २१५ उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय आणि शिंदेंची सेना एकत्र लढत आहेत. तर उद्धव बाळसाहेब ठाकरे आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसने ९ जागांवर उमेदवार दिले असून, शरद पवारांची राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, यांच्यासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे.

नगराध्यक्षपदासाठी हे आहेत मैदानात

भाजप, शिंदेसेना आणि आरपीआयने नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. तर शिवसेना ठाकरे गट प्रवीण नाईक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रवींद्र घोडेस्वार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शुभम चुनियान, वंचित बहुजन आघाडीचे नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाने प्रवीण पगारे यांच्यासह चार अपक्ष निवडणूक लढवित आहे.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...