पंचवटी | मनोज निकम | Panchavati
पंचवटी परिसरातील विविध भागांत महापालिकेचे नळ पोहोचले आहे. परंतु त्या नळाला पाणी नसल्याची परिस्थिती दिसून येत आहेत. तर आठ दिवसांनी काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. काही प्रभागांमध्ये ही समस्या बिकट झाली असून, नागरिकांना शेजारील प्रभागातून पाणी आणायला लागत आहे. पंचवटीत २२ जलकुंभ आहेत, तरीदेखील पंचवटीकरांच्या घशाला कोरडंच आहे, असे चित्र दिसून येत आहे.
पंचवटी विभागाची (Panchavati Division) एक वेगळीच ओळख आहे. तसेच, येत्या काळात पंचवटी विभागाचा विस्तार वाढत चालला आहे. त्याप्रमाणे नागरी व लोकवस्ती देखील वाढली आहे. पंचवटी विभागात एकूण सहा प्रभाग आहेत. यात सन २०१७ च्या आकडेवारीनुसार २ लाख ९३ हजार २३४ लोकसंख्या आहे. सर्वसामान्य नागरिक हे घरपट्टी, पाणीपट्टीद्वारे नाशिक महानगरपालिकेला कर भरतात.
एका व्यक्तीस १३५ ते २२५ लिटर पाणी (Water) उपलब्ध करून देणे ही नाशिक महानगरपालिकेची (Nashik NMC) एक जबाबदारी आहे. मात्र, पंचवटी विभागात बहुतांश भागांमध्ये कमी दाबाने पाणी अशी तक्रार आहे. तर काही ठिकाणी कमी वेळ पाणी अशा तक्रारी आहेत. पंचवटी विभागात आजरोजी २२ जलकुंभ हे कार्यरत आहे. नवीन आठ जलकुंभ पैकी काही जलकुंभ हे पूर्णत्वास आले असून, लाईन सेप्रेरेशन व पाइपलाइनचे काम सुरू आहे.
पंचवटीकरांना मिळेल पाणी
निलगिरी बाग येथील जलशुद्धीकारण केंद्राची क्षमता ही १० ते १२ एमएलडी आहे. या केंद्रावरील पाणी हे पूर्व विभागातील काही भागात देण्यात येते. पूर्व विभागाचे सद्यस्थितीत मुकणे धरणावरून पाणी घेणेबाबत नियोजन सुरू आहे. भविष्यात ते झाल्यारा पंचवटीफराना अधिकचे पाणी उपलब्ध होईल.
महिला म्हणतात…
- किमान दोन वेळ पाणी द्यावे.
- त्यात ते कमी दाराने नसावे.
- पाण्याची वेळ वाढवून द्यावी.
- नवीन जलकुमांची कामे लवकरात लवकर करावी.
- नवीन वाढलेला वसाहती बघता त्या अनुषंगाने नविन पाइपलाइन जोडणी देखील करावी.
येथे पाणी समस्या
प्रभाग क्रमांक एक – संभाजीनगर, स्नेहनगर, प्रभातनगर, ओमकार नगर, गणेशनगर, स्वाध्याय नगर, कलानगर, निसर्गनगर
प्रभाग क्रमांक दोन – आडगाव मळे परिसर, आडगावजवळील कॉलनी परिसर, कोणार्क नगर, जत्रा हंटिल परिसर, सेंट पीटर स्कूल पाठीमागील परिसर
प्रभाग क्रमांक तीन – मानेनगर, साईनगर, शिववृत्र्यानगर, बनारसीनगर, शक्तीनगर, गुंजाळ बाबानगर, हितवाडी रेड, गणेशवाडी
प्रभाग क्रमांक चार – अनुसयानगर, समर्थनगर, अष्टविनायकानगर, कर्णनगर, शिवांजलीनगर, तुळजाभवानी नगर,
प्रभाग क्रमांक पाच – पंचवटी गावठाण काही भाग, मधुबन कॉलनी परिसर,
प्रभाग क्रमांक सहा – भगवान बाबालगर, इंद्रप्रस्थनगरी, उदयनगर, वडजाइ मालानगर, महादेव कॉलनी, गामणे मळा, हनुमानवाडी
पेठरोडवरील सवाली फाठ येथील अमृतवन उद्यानात नवीन जलकुंभाचे व्जम सुरु आहे. मात्र, कामाची गती ही संथ असून, गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. प्रशासनाने या जलकुंभाचे काम लवकरात मार्गी लावावे, जेणे करून आनच्या आसातील पाण्याची समस्या संपेल.
प्रवीण जाधव, गोरक्षनगर, म्हसरूळ
मखमलाबाद विकाराचा विकास होत आहे, नागरी व लोकवस्ती वाढत चालली आहे. आमच्या भणारा पाण्याची समस्या ही गांभीर असून, शेजारी असलेल्या नगरातून हंडगाव्याने पागी घेऊन यावे लागते. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या पाण्याची समस्येचा निपटारा करावा.
शीला पवार, कोळीवाडा, मखमलाबाद
अनुसूयानगर, कर्णनगर परिसरात कमी दाबाने पाणी येते. परंतु काहीवेळा गढूळ दूषित पाणीपुरवठा होतो, कित्येक वेळा मनपाचे अॅपवर तक्रार नाँचवून देखील दखल घेतली जात नाही, असाच प्रकार चालू राहिल्यास स्थानिक परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहे.
शिवकुमार सुकते, अनुसूयानगर