Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik News : गुरव आत्महत्येचे काेडं सुटणार; सुसाईड नाेटनुसार तपास

Nashik News : गुरव आत्महत्येचे काेडं सुटणार; सुसाईड नाेटनुसार तपास

बापाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील काळाराम मंदिरालगत असलेल्या रामराज्य संकुलात साेमवारी(दि. १३) घडलेल्या गुरव कुटुंबातील बापलेकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर अखेर मृत दाेघांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. प्रशांत गुरव यांनी प्रथम विषप्राशन करुन गळफास घेत आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे. तर, विषाचे काही अंश अभिषेकच्याही पाेटात आढळले असून विष प्राशन करण्यापूर्वी प्रशांत यांनी मुलगा अभिषेक याला विष पाजले की त्याला वडिलांच्या जीवाच्या आकांताने विव्हळण्याचा आवाज आल्याने मानसिक व शारीरीक धसका बसून त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला का, याचा सखाेल तपास पंचवटी पाेलिसांनी सुरु केला आहे. 

- Advertisement -

दरम्यान, सापडलेल्या सुसाईड नाेटमध्ये नामाेल्लेख असलेल्या संशयितांवर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे कळते. ‘तुम्ही माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार आहात’, असा व्हाटस् अॅप मेसेज संबंधितास सेंट करुन सराफ व्यावसायिक प्रशांत आत्माराम गुरव (वय ४९) यांनी सकाळी सात वाजता दागिने क्लिनिंगसाठी वापरले जाणारे नायट्रिक फाॅस्फरस अॅसिड प्राशन करुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. काही मिनिटांनंतर ही घटना त्यांचा मुलगा अभिषेक (वय २९) याने पाहताच त्याला धक्का बसला. त्याने ही तत्काळ नातलगांना फाेनवर कळविली, तेव्हा त्यालाही अचानक फिट किंवा ह्रदय विकाराचा झटका किंवा विष प्राशन केल्याने त्याचाही दुर्देवी मृत्यू झाला.

पंचवटी पाेलिसांनी दाेन्ही बापलेकांच्या आकस्मिक मृत्यूच्या नाेंदी करुन प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरु करत जाबजबाब नाेंदविण्याची कार्यवाही सुरु केली आहे.  प्रशांत आत्माराम गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव(दाेघे रा. रामराज्य, उत्तर दरवाजा, काळाराम मंदिर, पंचवटी) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. माहितीनुसार, प्रशांत यांचे अनेकांशी व्यावसायिक, शेतजमीन व गुंतवणूक तसेच मालमत्तेसंदर्भाने व्यवहार हाेते. त्यानुसार, त्यांनी संशयित माेहनशेठ सचदेव यांच्यासह इतरांशी काेट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले आहेत. तर, साेलापूर येथे गुंतवणूक केल्यानंतर त्यात वारंवार अडचणी येत असल्याने प्रशांत हे तणावात हाेते.

दरम्यान, यातून प्रशांत यांनी (दि. १३) सकाळी सहा ते साडेसात वाजेदरम्यान माेबाईलवरुन माेहनशेठ सचदेव यांना व्हाट्स अॅप नंबरवर ‘तुम्ही माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार आहात’, असे लिहून मेसेज सेंट केला. त्यानंतर, त्यांनी काही वेळातच अँसिड किंवा विष पिऊन घेतले. अॅसिड पाेटात गेल्याने प्रशांत यांना असह्य वेदना झाल्या. ते विव्हळत पडले हाेते. यानंतर काही वेळातच अभिषेकच्या ताेंडातून फेस आल्याने व मिरगी आल्याने ताे बेशुद्ध पडला. घटना कशीबशी कळताच गुरव यांच्या नातलगांनी दाेघांनाही काही मिनिटांच्या अंतराने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घाेषित केले हाेते.

लवकरच दाखल हाेणार गुन्हा

‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब… दिलीप सचदेव म्हणजे मोहन सचदेव, सोलापूर व अमोल यादव व मी प्रशांत गुरव आमच्यात कोर्टासमोर कुमेढ नाका येथील जागा हक्क सोडायचा व्यवहार झाला होता. मोहनशेठ यांना पाच कोटी द्याचे व अमोलचे डीपॉझिट एक कोटी वजा करायचे, असे ठरले. दोघेही आता ऐकायला तयार नाहीत. कोर्टासमोर लिहून दिल्याप्रमाणे अमोलने वागावे. मोहनशेठ यांनी त्यांचा फ्लॅट आहे म्हणून २५ टक्के रक्कम घ्यावी, ७५ टक्के गुरव फॅमिलीला द्यावी’, या स्वरुपाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आहे. यासह प्रशांत यांनी इतरांकडून घेतलेल्या व इतरांना दिलेल्या रकमेचाही हिशेब लिहिला आहे. त्यानुसार चार कोटी, दोन कोटी, एक कोटी, पंचवीस लाख या स्वरुपाच्या रकमांसमोर काही व्यक्तिंची नावे लिहून त्यांच्याकडून पैसे घेणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘ही मला त्रास देणारी माणसे’ असेही त्यांनी लिहिले आहे. या नाेटनुसार तपास सुरु असून पुढील दाेन तीन दिवसांत संशयितांवर गुन्हा नाेंदविला जाऊ शकताे. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...