Friday, October 18, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्ह्याची मतदारसंख्या ५० लाखांवर; मालेगावची विशेष गती

Nashik News : जिल्ह्याची मतदारसंख्या ५० लाखांवर; मालेगावची विशेष गती

नाशिक पूर्व, मध्य, पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

नाशिक | Nashik

लोकसभा निवडणुकीनंतरच्या (Loksabha Election) साडेचार महिन्यांत जिल्ह्यातील मतदारांच्या (Voters) संख्येत १ लाख ६७ हजारांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता ५० लाख ३ हजारांवर पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उत्स्फूर्तपणे मतदान केले. मतदानाची टक्केवारी चांगली राहिल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

लोकसभेच्या निकालानंतर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना अंमलात आणली. परिणामी, महिला मतदारांच्या (Women Voters) नोंदणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. एकूण १ लाख ६७ हजार नवमतदारांमध्ये ९६ हजार ५३८ महिलांचा समावेश आहे. तर पुरुष ७० हजार ९४४ इतके आहेत. जिल्ह्यात एकूण ११८ तृतियपंथी मतदारांची नोंद झाली आहे. साडेचार महिन्यांत मतदान नोंदणी झपाट्याने झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता ५० लाख तीन हजारांवर जाऊन पोहचली आहे.

हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील

नाशिक शहरातील (Nashik City) पश्चिम, पूर्व आणि मध्य या तीन मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. प्रत्यक्षात मतदार नोंदणीत मालेगाव शहराने आघाडी घेतलेली दिसून येते. धुळे लोकसभेच्या निकालाला कलाटणी देण्याची करामत करणाऱ्या मालेगाव मध्य या मतदारसंघात ३७ हजार ६१९ मतदारांची नोंद झाली. तसेच मालेगाव बाह्य या मतदारसंघात १४ हजार ३४१ मतदारांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये २५ लाख ८९ हजार पुरुष तर, २४ लाख १४ हजार महिलांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

लोकसभेला ४८ लाख ३६ हजार मतदार

लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील ४८ लाख ३६ हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यातील मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांनी धुळे लोकसभेसाठी मतदान केले.

पुढील महिन्यात विधानसभेचा बिगूल?

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार हे तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यानंतर आचारसंहिता घोषित करुन विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदान नोंदणी झपाट्याने वाढली. लोकप्रतिनिधी व वैयक्तिक मतदार यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे ही वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत नोंदणी करणे शक्य आहे.

डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

विधानसभानिहाय मतदार

नांदगाव३,३७,९९२
मालेगाव मध्य३,४०,०१०
मालेगाव बाह्य३,७५,१५६
बागलाण२,९६,१५९
कळवण२,९९,२७३
चांदवड३,०५,७४४
येवला३,२१,९७९
सिन्नर३,१७,८५९
निफाड२, ९५, ९३९
दिंडोरी३,२७,२००
नाशिक पूर्व४,०४,१९३
नाशिक मध्य३,४२,४१३
नाशिक पश्चिम४,७६, ९४६
देवळाली२,८५, ७०८
इगतपुरी२,७७,३२२
एकूण ५०,०३, ८९३

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या