Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : रामकाल पथमार्गात २८ जीर्ण वाड्यांची अडचण

Nashik News : रामकाल पथमार्गात २८ जीर्ण वाड्यांची अडचण

धोकादायक वाड्यांची मनपा मजबुती तपासणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकाराकडून (Central Government) शंभर कोटी रुपये निधी प्राप्त होऊन नाशिकच्या (Nashik) गंगाघाट परिसरात (Ganga Ghat Area) तयार होणाऱ्या महत्वाकांक्षी रामकाल पथमार्गात (Ramkal Path Route) सुमारे २६ जुने व धोकादायक वाडे येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाकडून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. तर वेळप्रसंगी त्यांची मजबुती देखील तपासण्याची तयारी करण्यात आली आहे. २०२७ च्या सिंहस्थापूर्वी रामकुंड व गोदाकाठ परिसरात रामकालपथ हा ड्रीम प्रोजेक्ट साकारला जाणार असून त्या मार्गातील धोकेदायक व जीर्ण झालेले बाडे कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला (Nashik NMC) शंभर कोटी निधी रामकालपथ हा प्रकल्प साकारण्यासाठी मंजूर केला आहे. रामकुंड, गोदाकाठ, काळाराम मंदिर व सीतागुंफा या पौराणिक महत्व असलेल्या परिसरात अध्यात्मिक कॉरिडोर तयार केला जाणार असून रामायणातील प्रसंगावर आधारित शिल्प साकारले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून गुजरातमधील एचसीपी (HPC) ही कंपनी नियुक्त केली आहे. ज्या ठिकाणी हा प्रकल्प साकारला जाणार आहे तेथे दीडशे दोनशे वर्ष जुने वाडे आहेत. ते धोकेदायक अवस्थेत असून जीर्ण झाले आहेत. धोकेदायक अवस्थेमुळे अनेक वाड्यांमध्ये कोणीही राहत नसून ते रिकामे आहेत.

तर काही वाड्यात अजूनही नागरिक राहतात. रामकालपथ हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवताना या परिसरातील वाडे सुरक्षिततेच्या दृष्टिने धोकेदायक ठरु शकतात. हा धोका ओळखत महापालिका बांधकाम विभाग (Construction Department) येथील २८ धोकेदायक वाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. त्यात बाड्याची मजबुती, पाडण्याची आवश्यकता अथवा डागडुजीची गरज या बाबी तपासल्या जातील. या अहवालानंतर धोके दायक वाड्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. महापालिकेला डिसेंबर २०२६ पूर्वी रामकालपथ महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...