Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : नवीन नाशकात अतिक्रमणाचे साम्राज्य

Nashik News : नवीन नाशकात अतिक्रमणाचे साम्राज्य

मनपाकडून ठोस उपाययोजनांची गरज

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

सिडको या गृहनिर्माण संस्थेने सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत सिडकोच्या १ ते ६ योजना अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या मध्यावर निर्माण केल्या मात्र, वाढत्या लोकसंख्येसोबतच येथे अतिक्रमण बाढले आणि यामुळे वाहनांच्या पार्किंगचा (Parking) प्रश्न भेडसावू लागला. नवीन नाशिक परिसरात (New Nashik Area) त्रिमूर्ती चौक, पवननगर, शिवाजी चौक शॉपिंग सेंटर, दत्त चौक, माणिकनगर, माऊलीलॉन्स आदी परिसरात अधिकृत व अनधिकृत भाजी मार्केट आहेत.

- Advertisement -

यातील त्रिमूर्ती चौक परिसरात टपरीधारकांना सिडको प्रशासनाच्या वतीने गाळे देण्यात आले. कालांतराने येथे भाजी व्यवसायासोबतच इतर व्यवसाय देखील सुरु झाले. मुख्य रहदारीचा परिसर म्हणून या परिसराची ओळख आहे. याठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात न आल्याने येथे वाहतुकीची कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याठिकाणी काही व्यावसायिकांनी तर आपला गाय सोडून बाहेरच आपले दुकान (Shop) थाटले आहे व त्यांच्या पुढे बाहनांची पार्किंग होते. परिणामी अर्धा रस्ता हा वाहनांनी भरला गेल्याने वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) होते.

पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केटच्या पार्किंगच्या जागी फळविक्रे तेव अन्य व्यावसायिकांनी आपली दु‌काने थाटल्याने वाहन चालकांना आपली बाहने रस्त्यावर लावाबी लागल्याने येथे दररोजच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे भाजी मार्केटसाठी सिडको प्रशासनाने पक्के गाळे बांधून दिले असले तरी सकाळच्या व सायंकाळच्या वेळी लेखानगरच्या दिशेने जाणाऱ्या सत्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते बसलेले असतात, शनिवार व रविवारी या रस्त्याला तर जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे फार कठीण होते.

सध्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणाहून जास्त प्रमाणात वाहतूक सुरूनाही. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता देखील येत नाही. माणिकनगर येथे महावितरणच्या अति उच्च दाबाच्या लाईनच्या खालीच धोकेदायक पद्धतीने भाजी बाजार दररोजच थाटला जातो. याठिकाणी तर पार्किंगची कुठलीही व्यवस्थाच नसल्याने भाजी बाजारात आलेले ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने लावल्याने सायंकाळच्या वेळी येथे वाहतुकीची कोंडी होत असते. पार्किंगच्या ठिकाणी काही ना काही अतिक्रमण झाल्याचे दिसते तर परिसरांत रस्त्याकील पार्किंगमुळे होणारी वाहकीची कोंडी आढावा नाशिक शहराचा (Nashik City) सोडविण्यालाठी मनपा अतिक्रमण विभाग व वाहतूक शाखेने कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

अनधिकृत फलकाचे साम्राज्य

परिसरात असलेल्या मुख्य चौकांमध्ये रस्ता दुभाजकांमध्ये असलेल्या पथदीपांवर राजकीय पक्षांचे, भाई-दादांचे अनधिकृत फलक लावण्यात येत आहेत. महापालिकेतर्फे अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर व्यावसायिकांवर शहर विद्वपीकरण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, राजकीय पदाधिकारी तसेच भाई-दादांच्या फलकांवर महापालिकेच्या अधिका-यांकडून गुन्हे दाखल करण्यास उदासीनता अद्यापही दिसून येत आहे.

दुकानाबाहेरील जागा भाडेतत्वावर

नवीन नाशकात बयाच ठिकाणी काही व्यावसाविकांनी आपल्या दुकानाबाहेर असलेली पार्किंगची जागा भाडे तत्वावर दिली असल्याचे काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगितले. महापालिकेने असे व्यावसायिकही शोधून काढण्याची गरज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...