नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील (City) रस्त्यांवर खड्डे (Potholes) आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी परिस्थिती आहे. यामुळे सामान्य नागरिक वैतागले असून विविध राजकीय पक्षांनी लहान मोठे आंदोलने करुन देखील शहरातील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाही. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्यासह रस्ते (Road) दुरुस्तीवर मनपाकडून गत आठ महिन्यात तब्बल ३१ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : यंदा जिल्ह्यात दमदार बरसला; गत वर्षापेक्षा २७ टक्के जादा पाऊस
यंदा अर्थसंकल्पात (Budget) ८० कोटी रुपयांची तरतूद असून आता पुढील चार महिन्यात सुमारे ५० कोटी रुपये मनपाला खर्च करावे लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या कर व इतर मार्गाने मनपाच्या तिजोरीत पैसा गोळा होतो, मात्र मोठ्याप्रमाणात तोच पैसा खर्च करुन देखील शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने मनपाने कोटींचा खर्च कुठे केला?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांची चाळणी होते. यामुळे अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
हे देखील वाचा : शरद पवारांचा छगन भुजबळांविरुद्ध उमेदवार ठरला? ‘या’ नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट
नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) माध्यमातून कोट्यवधी रुपये पावसाळ्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाले तरीही स्त्यांची अवस्था जैसे थे राहात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक महापालिकेने मागील आठ महिन्यांमध्ये ३१ कोटी २१ लाख रुपये फक्त रस्त दुरुस्तीसाठी खर्च केले आहेत. मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. म्हणून यामध्ये भ्रष्टाचार तर झाला नाही ना? असा प्रश्न नाशिककर (Nashik) विचारत आहे.
हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”
विभागनिहाय खर्च
नाशिक पूर्व | ६ कोटी ३८ लाख |
नाशिक पश्चिम | ५ कोटी ८२ लाख |
पंचवटी | ४ कोटी ७८ लाख |
नाशिकरोड | ३ कोटी ३० लाख |
सातपूर | ५ कोटी ९८ लाख |
नवीन नाशिक | ४ कोटी ९२ लाख |
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा