Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : यंदा जिल्ह्यात दमदार बरसला; गत वर्षापेक्षा २७ टक्के जादा...

Nashik News : यंदा जिल्ह्यात दमदार बरसला; गत वर्षापेक्षा २७ टक्के जादा पाऊस

नाशिक | Nashik

‘जल है तो जीवन है’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जलसाठा (Water Reservoir) हा तितकाच महत्त्वाचा असतो. दरवर्षी अनियमित पावसाचा (Rain) फटका सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात बसत असतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने बळीराजा सुखावला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वरुणराजाने जिल्ह्यावर (District) कृपादृष्टी बरसवली असून, यंदा २७ टक्के जादा पाऊस झाल्याने सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याचा (Rainy Season) कालावधी विचारात घेतल्यास दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेकवेळा दडी मारलेला पाऊस अवकाळीसारखा धो-धो बरसत असतो. त्यामुळे शेतीला फायदा होण्याऐवजी नुकसानच मोठ्या प्रमाणात होत असते.

हे देखील वाचा : पुण्यात कोसळलेल्या ‘त्या’ हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

पर्जन्यराजाच्या या अनियमितपणाला यावर्षी मात्र शिस्त लागल्याचे दिसून आले. अतिशय संथ आणि शांतपणे बरसलेला पाऊस यंदा कोणतीही मोठी हानी न पोचवता जनसामान्यांना अत्यावश्यक असलेली जलपूर्ती करण्यासोबतच जिल्ह्यावरील जलसंकट टाळण्याचे मोठे काम केले आहे. मागील वर्षीच्या पर्जन्यमानाचा विचार केल्यास जिल्ह्यात ६४२.५ (६८.७०) टक्के पाऊस बरसला होता. तेच प्रमाण यावर्षी ९००.४ म्हणजेच ९६.२ टक्के एवढे आहे, नाशिक विभागात (Nashik Division) विचार केल्यास मागील वर्षीं ५४४.६ (७६.८ टक्के) तर यावर्षी ७८९.४ म्हणजेच (१११.४ टक्के) एवढा पाऊस बरसलेला आहे.

हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

टँकर शून्यावर

मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती होती. मागिल दिड वर्षात जिल्हाभरातील तीन तालुक्यांसह ६० महसूल मंडलात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवले होते. त्यामुळे मार्च २३ ते सप्टेंबर २४ दरम्यान या भागांना सर्वाधिक ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाच्या पाण्याच्या तुटवड्याचा जास्त फटका हा सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव या भागाला बसला होता. मात्र चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यापासूनच परिसराला टँकरमुक्त करण्यात यश आले आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : २ ऑक्टोबर २०२४ – अराजक कोण थांबवणार ?

विसर्गामुळे पूरसदृश स्थिती

दरवर्षी पावसाळ्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहराच्या सर्वच भागातून पाण्याचे लोट नदीत येत असल्याने दरवर्षी २-३ वेळा गोदावरीला पूर येत असतो. त्याचे विपरित परिणाम नदी काठच्या जनजीवनावर होत असतात. यंदा मात्र धरणात पाणी वाढल्याने पाण्याच्या विसर्गामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्ष पूर आलाच नसल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या