Tuesday, April 21, 2026
Homeक्राईमNashik News : दुर्दैवी घटना! लोखंडी गेट अंगावर पडल्याने तेरा महिन्यांच्या बालिकेचा...

Nashik News : दुर्दैवी घटना! लोखंडी गेट अंगावर पडल्याने तेरा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर राेडवरील (Gangapur Road) ध्रुवनगरात साेमवारी (दि. २०) हृदयद्रावक घटना घडली आहे. साेयायटीचे लोखंडी गेट अचानक अंगावर पडल्याने तेरा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू (Death) झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, आराध्या दीपक मागूलकर (वय १३ महिने, रा. महालक्ष्मी लाेट्स) असे मृत बालिकेचे नाव आहे. आराध्या ही साेमवारी दुपारी एक वाजता आईसह साेसायटीतून जात हाेती.  त्याचवेळी साेसायटीचे लोखंडी गेट अचानक निखळले आणि थेट आराध्याच्या अंगावर काेसळले. गेटचे वजन जास्त असल्याने आराध्या गंभीर जखमी झाली. तिचे काका सतिश शिनगर आणि शेजाऱ्यांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अवघ्या १३ महिन्यांच्या आराध्याचा असा अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) करण्यात आली असून, घरातील किंवा सोसायट्यांमधील लोखंडी गेटचे मेंटेनन्स आणि त्यांची मजबुती किती महत्त्वाची असते, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : गावठी कट्ट्यासह दोन जण ताब्यात; 5.52 लाखांचा मुद्देमाल...

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात कारवाई करत गावठी कट्टा (Gavthi Katta) व काडतुसांसह (Cartridges) दोन आरोपींना...