Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik News : रामवाडी पूल बंद; कोंडीत अडकले नाशिक, वाहनांच्या गर्दीमुळे मध्यवर्ती...

Nashik News : रामवाडी पूल बंद; कोंडीत अडकले नाशिक, वाहनांच्या गर्दीमुळे मध्यवर्ती भाग जाम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अशोकस्तंभाजवळील घारपुरे घाटाजवळ सुरू असलेल्या सिंहस्थ विकासकामांतील (Simhastha Work) ड्रेनेज पाईपलाईनच्या खोदकामामुळे शनिवारी (दि. ६) शहराच्या मुख्य भागातील वाहतुकीचा फज्जा उडाला. दि. ५ आणि ६ जून असे दोन दिवस हा मुख्य रस्ता पूर्णतः बंद ठेवल्याने प्रशासनाने पर्यायी वाहतुकीत मोठे बदल केले होते. मात्र, योग्य नियोजनाअभावी संपूर्ण मध्यवर्ती नाशिक कोंडीच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले.

- Advertisement -

रामवाडी पूल (Ramwadi Bridge) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यामुळे बायजाबाईची छावणीजवळून दोन्ही बाजूंची वाहने पर्यायी मार्गाने डायव्हर्ट करण्यात आली होती. त्यामुळे याचा परिणाम अशोकस्तंभ ते रविवार कारंजा आणि थेट मालेगाव स्टॅण्डपर्यंत ट्रॅफिक जामच्या समस्येत दिसून आला. आधीच रामवाडी-सिद्धेश्वर मंदिराजवळील रस्ता पूर्णतः बंद असल्याने पर्यायी मार्ग शोधून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना इतर रस्त्यांवरही प्रचंड कोंडीचा सामना करावा लागला.

त्यातच आधीच विस्कळीत झालेल्या वाहतुकीत दुपारी आणखी एक भर पडली. एम.जी. रोड येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आढावा व सूचना बैठक होती. या बैठकीनिमित्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली. कार्यकर्त्यांची वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त लागल्याने एम.जी. रोडसह मेहेर सिग्नलचा श्वास काही काळ कोंडला होता. परिणामी, दुपारच्या सुमारास या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

विकासकामांच्या नावे शहराची चाळण

सिंहस्थ विकासकामांच्या नावे संपूर्ण शहराची चाळण करण्यात आली असून, जिकडे तिकडे रस्त्यांचे खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे नाशिककर वाहनधारकांचा संताप आता अनावर होत चालला आहे. खोदकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेडिंग आणि योग्य दिशादर्शकांचा अभाव असल्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अहिल्यादेवी होळकर पुलावर ताण

पंचवटीतून गंगापूररोड, अशोकस्तंभ आणि रविवार कारंजाला जोडणारा मुख्य रस्ता घारपुरे घाटावरील सिद्धेश्वर मंदिरासमोर खोदून ठेवल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतुकीचा ताण अहिल्यादेवी होळकर पुलावर आला. येथे बराच वेळ वाहने जागीच अडकून पडली होती. वाहतूक पोलिसांसह ट्रॅफिक वॉर्डन्सनी भरउन्हात वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्रशासनाने दिलेले पर्यायी मार्गही वाहनांच्या अतिरिक्त संख्येमुळे जाम झाल्याने पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...