Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik News : जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे इन्स्टाग्राम; सोशल...

Nashik News : जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे इन्स्टाग्राम; सोशल मीडियाच्या वापरामुळे दोन परस्परविरोधी घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम (Instagram) हे आणि यासारखे सोशल मीडिया (Social Media) शाप की वरदान अशा चर्चा नेहमीच घडतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या या महाजालाचा वापर आपण ज्या हेतूने करू तसा त्याचा परिणाम होतो हे आता स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमागचे कारण इन्स्टाग्राम आहे.

- Advertisement -

मात्र त्या दोन्ही घटना परस्परविरोधी असून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे इन्स्टाग्राम याचा प्रत्यय त्यातून आला. यातील एका घटनेत इन्स्टा अकाऊंटमुळे (Account) दीड वर्षानंतर बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी झाले तर दुसऱ्या घटनेत इन्स्टावर व्हिडिओ टाकल्यामुळे विधिसंघर्षितांमध्ये तुफान हाणामारी झाली असून त्यातील दोघे गंभीर आहेत.

‘इन्स्टा’ ॲक्टिव्ह होताच सुरतला सापडला मुलगा

आडगाव हद्दीतील घरातून अचानक बेपत्ता (Missing) झालेल्या साडेपंधरा वर्षीय मुलाचा अखेर दीड वर्षानंतर शोध लावण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले. धक्कादायक बाब म्हणजे ‘सावत्र आई जेवण देत नसल्याने व वडील शिक्षणाचा भार पेलत नसल्याने’ जेरीस आलेल्या मुलाने गृहत्याग केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली असून आता त्याचा ताबा सख्ख्या आईकडे सोपवण्यात आला आहे. या मुलाने (Child) इन्स्टा अकाऊंट अॅक्टिव्ह केल्याने त्याचा सुरतला शोध लागला.

इन्स्टावर व्हिडिओ अपलोड करण्यावरून राडा

सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर (Sarkarwada Police Station) विधिसंघर्षित मुलांच्या दोन गटांत तुफान राडा घडल्याची घटना स्वातंत्र्यदिनी (दि. १५) घडली. याबाबत एका गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार दुसऱ्या गटातील सात विधिसंघर्षितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इन्स्टाग्रामवर रिल्स व व्हिडिओ अपलोड का केले अशी कुरापत काढून ही मारहाण करण्यात आली.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे...