Thursday, July 2, 2026
Homeनाशिकचांदगिरी-शिंदे रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात काका-पुतणी जखमी

चांदगिरी-शिंदे रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात काका-पुतणी जखमी

नाशिकरोड | प्रतिनिधी 

दुचाकीने प्रवास करणाऱ्या काका आणि पुतणीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक-सिन्नर रस्त्यावरील चांदगिरी येथून शिंदेगावाकडे जाणाऱ्या काका पुतणीवर बिबट्याने हल्ला केला.

- Advertisement -

वनविभागाच्या माहितीनुसार चांदगिरी येथील जंगलातून बिबट्या सावजाच्या शोधात जात असताना हा अपघात घडला आहे. यामुळे परिसराती ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

नामदेव दत्तु कळंबकर आणि मोनिका रमेश कळंबकर हे काका-पुतणी चांदगिरी येथील रहिवाशी आहेत. कामानिमित्त शिंदेगावाकडे जात असताना बिबट्याने हल्ला केला.

कळंबकर दुचाकीने पुतणीला सोबत घेऊन जात असतानाच रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.

या घटनेत मोनिकाच्या उजव्या पायाला आणि कंबरेला इजा झाली असून, नामदेव यांच्या कंबरेवर बिबट्याने पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

ताज्या बातम्या

धक्कादायक! उघड्या मॅनहोलने घेतला एकाचा बळी; २० फूट अंतरावर सापडला मृतदेह,...

0
मुंबई | Mumbai राज्यातील काही जिल्ह्यांत काल (बुधवारी) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) देखील पावसाने (Rain) हाहाकार घातला असून, पावसामुळे (Rain) एक...