Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik News : वृक्षतोड निर्णयाविरोधात तपोवनात विविध आंदोलने

Nashik News : वृक्षतोड निर्णयाविरोधात तपोवनात विविध आंदोलने

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

वृक्षतोड निर्णयाविरोधात (Tapovan Tree Cutting) तपोवनात पर्यावरणप्रेमी, शिंदे पक्ष, प्रहार यांनी शुक्रवारी आंदोलने केली. यावेळी तपोवन बचाव समितीने एल्गार पुकारात ५०० पेक्षा अधिक हरकतनामा पत्र शुक्रवारी (दि. ५) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) स्पीड पोस्टने रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

पर्यावरणप्रेमी संघटना व राज्यातील नागरिक तसेच वृक्षप्रेमींचे नाव असलेले हरकतनामा पत्र रोजच्या रोज टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येणार असल्याचे तपोवन बचाव समितीतर्फे सांगण्यात आले आहे. बंद लिफाफ्यात ५ हरकतनामा पत्र असे जवळपास पाचशेहून अधिक पत्र (Letter) रवाना करण्यात आले आहे.

सिंहस्थाच्या (Simhastha) नावाखाली पालिका प्रशासन तपोवन वृक्षतोड करून निसर्गाला हानी पोहचवू पाहत आहे. सिंहस्थ कालावधीत येणाऱ्या साधू, महंतांचे पंडाल तपोवनाच्या (Tapovan) बाहेरील जागेवर बनवावे, मनपा, राज्य शासनाने घेतलेला वृक्षतोड निर्णय रद्द करावा, असा उल्लेख या हरकतनामा पत्रात असून वृक्षतोड बाबतीत रोजच्या रोज येणारे हरकतनामा पत्र पाठविले जाणार आहे.

आयटकचा विरोध

तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड विरोधातील आंदोलनाला शुक्रवारी (दि. ५) सकाळी आयटक घरेलू कामगार महिला संघटनेने पाठींबा देत प्रशासनाच्या वृक्षतोड भूमिकेला विरोध दर्शविला. सकाळी घरेलू कामगार महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून झाडांना अलिंगन देत तपोवन वाचवा, झाडे वाचवा, सिंहस्थ नावाखाली होणारी वृक्षतोड थांबवा, तपोवन आमच्या हक्काचे अशा घोषणा देत प्रशासनाच्या वृक्षतोड निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यावेळी कॉम्रेड राजू देसले, मीना आढाव, सुषमा उघडे, प्रणाली चंद्रमोरे, पृष्या गवळी, मीना पवार, लता पाथरे, हसीना शेख आदिंसह घरेलू महिला कामगार संघटनेच्या महिला सभासद सहभागी झालेल्या होत्या.

प्रहारचे निसर्ग वाचवा…

शुक्रवारी (दि. ५) सकाळी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे तपोवनात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन हातात वृक्षतोड न करण्याचे फलक झळकवत घोषणाबाजी करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एकीकडे निसर्ग वाचवा असे प्रशासन सांगत आहे तर दुसरीकडे प्रशासनच वृक्षांची कत्तल करत निसर्गाच्या विरोधात भूमिका बजावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, सरचिटणीस प्रमोद केदोरे, संतोष मानकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, शहराध्यक्ष ललिता पवार, जिल्हाध्यक्ष ललित पवार, बच्चू निकाळजे, सोमनाथ नागरे आदिंसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...