Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनमाडमधील आठवडे बाजार आजपासून बंद; पंचक्रोशीत नाराजी

मनमाडमधील आठवडे बाजार आजपासून बंद; पंचक्रोशीत नाराजी

मनमाड | प्रतिनिधी Nashik

नगरपरिषद प्रशासनाने (Nagarparishad Administration) शहरात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार (Weekly market) आजपासून बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यधिकारी विजय कुमार मुंढे (CO Vijay kumar munde) यांनी दिली….

- Advertisement -

आठवडे बाजार बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदाराना याचा फटका बसणार आहे. तिकडे शहरालगत असलेल्या गावासोबत शहरातील ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे.

शिवाय आठवडे बाजारात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होणारी लाखो रुपयांची उलढालीवर देखील परिमाण होणार आहे.

सुमारे 75 वर्षापासून मनमाडला दर रविवारी भगतसिंग मैदान (Bhagadsing Ground), शिवाजी चौक (Shivaji Chauk), कॉलेज रोड (College Road), इदगाह परिसर (eidgah ground), जैन मंदिर परिसर (Jain temple area) या भागात रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यात शहरातील नागरिकासोबत पंचक्रोशीतील शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला, धान्य यासह इतर वस्तू घेऊन येतात तर इतर दुकानदार व व्यासायिक आपापली दुकाने थाटतात.

वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते.शहराची अर्थव्यवस्था एका प्रकारे आठवडे बाजार, बाजार समिती आणि रेल्वे स्थानकावर या तीन घटकावर जास्त अवलंबून आहे. नाशिक जिल्ह्यात नामाकिंत असलेल्या बाजार समित्या पैकी एक मनमाड बाजार समिती मानली जाते.

या बाजार समितीत मनमाड शहर परीसरासह नांदगाव, चांदवड, येवला, मालेगाव, चाळीसगाव आदी तालुक्यातील शेतकरी कांदा, गहू, मका, भाजीपाला यासह इतर शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे वर्षाला तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. हजारो शेतकरी त्यांचा शेतमाल विकल्यानंतर मनमाडच्या बाजार पेठेतून जीवनावश्यक वस्तू सोबत कपडे, चैनीच्या वस्तू खरेदी करतात हीच परिस्थिती आठवडे बाजाराची असून येथेही पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी, दुकानदार,

व्यावसायिक येतात. त्यांच्यात झालेल्या खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणात उलढाल होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड रेल्वे स्थानक महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते येथून रोज सुमारे 125 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होत असते. त्यामुळे सर्व प्लॉटफार्मवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते त्यातून रोज शेकडो प्रवासी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी सोबत शनीच्या दर्शनासाठी शनी सिंगनापुरला जातात.

रेल्वे स्थानकावर असलेल्या कॅन्टीन, स्टाल आणि रेल्वे गाडीवर शेकडो वेटर-वेंडर खाद्यपदार्थ विक्रीचे काम करतात.

या तिन्ही ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलढाल होत असल्यामुळे त्याचा फायदा शहराच्या अर्थकारणाला मिळतो. मात्र, करोनामुळे तब्बल दोन वर्षे आठवडे बाजार आणि रेल्वे बंद होती, तर कधी दुष्काळ, कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी आदी सारख्या वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.त्यामुळे नेहमीच्या तुलनेत लिलावासाठी शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली.

तिन्ही घटकाचा परिणाम शहराच्या अर्थकारणावर होऊन एका प्रकारे शहरावर मोठ्या प्रमाणात अर्थ संकट आले होते. करोना आटोक्यात आल्यानंतर रेल्वे सुरु झाली. त्यापाठोपाठ आठवडे बाजार देखील सुरु झाला होता. त्यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळालेला असतांना करोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.

गर्दीमुळे करोनाचा जास्त फैलाव (Covid Outbreak) होत असल्याने रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या