Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : फाळके स्मारक विकासाला गती कधी?

Nashik News : फाळके स्मारक विकासाला गती कधी?

प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास मनपाचा महसूल वाढणार

नाशिक | फारूक पठाण | Nashik

नाशिकमध्ये (Nashik) पर्यटकांना (Tourists) आकर्षित करण्यासाठी तसेच नाशिककरांना एक चांगला अनुभव मिळावा यादृष्टीने महापालिकेच्या (NMC) फाळके स्मारकाचा विकास ‘रामोजी फिल्म सिटी’च्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या नियोजित प्रकल्पाकडे महापालिकेचेच दुर्लक्ष झाल्याने हा प्रकल्प रडखला आहे. मनपाला नुकत्याच सक्षम अधिकारी अशी ख्याती असलेल्या मनीषा खत्री (Manisha Khatri) आयुक्त म्हणून लाभल्या आहेत. त्यांनीच याकडे लक्ष पुरवून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी अपेक्षा नाशिककर नागरिक व्यक्त करत आहेत. हा प्रकल्प आकारास आल्यास त्यातून मनपाच्या महसुलात भरीव वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

- Advertisement -

मध्यंतरी राज्य शासनाने फाळके स्मारकासाठी (Phalke Memorial) १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र त्याचे पूढे काहीच न झाल्याने नाशिककर आश्चर्य व्यक्त करत आहेत. ‘रामोजी फिल्म सिटी च्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्याच्या दृष्टीने दोन वर्षांपूर्वी सल्लागार नेमणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नंतर मात्र त्याला खीळ बसली, सल्लागारच संपूर्ण डीपीआर तयार करून देणार होता. मनपा तो डीपीआर शासनाकडे सादर करणार होती. पालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून रमेश पवार असताना त्यांनी या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला होता. नाशिक महापालिकेकडे सध्या पैशांची कमतरता आहे. त्यामुळे शासनाच्या निधीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. यामुळे नाशिकच्या सौंदर्यात भर तर पडणार आहेच शिवाय मनपालाही उत्पन्नाचा चांगला स्त्रोत मिळणार आहे.

शहर प्रवेशाच्या ठिकाणी पाथर्डी फाटा येथे नाशिकचे वैभव ठरलेल्या फाळके स्मारकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. तत्कालीन भाजप महापौर सतीश कुलकर्णी यांनीही प्रयत्न केले होते. नाशिकचे पालकमत्री असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही महापालिकेत येऊन फाळके स्मारक महापालिकेनेच चालवावे, अशी सूचना केली होती. त्यानंतरच रामोजी फिल्म सिटीच्या धतींवर फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्या ठिकाणी मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण व्हावे तसेच कलाकारांनी येथे यावे, या पद्धतीने येथील वातावरण तयार करण्यात येणार होते. अशा काही सुविधा फाळके स्मारकात मिळाल्या तर नागरिकांची पावले या ठिकाणी वळतील, चित्रपटांचे चित्रिकरण पाहण्यासाठी लोक तेथे जातील. त्यातून मनपाला उत्पन्न मिळू शकेल.

नाशिकच्या वैभवात भर घालणारे, ऐतिहासिक महत्त्व असलेले व पर्यटकांचे आकर्षण असणारे पांडवलेणेस्थित चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मारक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. त्या ठिकाणी अनेक सुविधा देण्यास मनपा प्रशासन असमर्थ ठरत आहे. त्यामुळे येणारे पर्यटक रोष व्यक्त करतात. करोना काळापासून फाळके स्मारक बंद होते. नंतर स्मारक सुरू झाले तरी तेथील वॉटर पार्क, मिनी थिएटर, दादासाहेब फाळकेंची माहिती असलेले संग्रहालय, रंगबिरंगी दिवे आणि कारंजे बंद आहेत. मागील बाजूला असलेले खाद्यपदार्थाचे स्टॉलदेखील बंद असतात. यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो.

२९ एकर जागेवर भव्य स्मारक

दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९९८ मध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी २९ एकर जागेवर भव्य स्मारक उभारण्यात आले. खुले थिएटर, उद्यान, कैफेटेरिया, दादासाहेबांनी हाताळलेल्या वस्तूंचे प्रदर्शन इत्यादी स्मारकाची वैशिष्टे होती. मात्र कालांतराने स्मारकातील प्रत्येक सेवेचे खासगीकरण झाल्यानंतर प्रकल्पाची वाताहत होत आहे. पूर्वी मुंबईच्या फिल्म सिटीच्या धर्तीवर वा स्मारकाचा विकास करण्याची योजना मनपाने आखली होती. नंतर ‘रामोजी फिल्म सिटी’च्या धर्तीवर विकास करण्याचे ठरले होते. सध्या मात्र यापैकी काहीच होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी पीपीपी तत्वावर स्मारक विशसित करण्यासाठी स्वारस्य देकार मागवण्यात आले होते. एनडी स्टुडिओचे नितीन देसाई यांच्यासह मुंबईच्या मंत्रा एक्सपोर्ट प्रा. लिमिटेड यांनी स्मारक चालवण्यासाठी आपली तयारी दर्शवली होती. या कंपन्यांनी त्यावेळी आयुक्तांसमोर प्राथमिक प्रस्ताबाचे सादरीकरणही केले होते. यानंतर आयुक्तांनी या दोन्ही कंपन्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. एनडी स्टुडिओ आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड किंवा मंत्रा एक्सपोर्ट प्रा. लिमिटेड कंपनीला काम मिळाले असते तर बुद्धविहारचा परिसर वगळता अन्य परिसर कंपनीकडे २५ वर्षांच्या कराराने हस्तांतरित केला जाणार होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...