Tuesday, April 15, 2025
HomeनाशिकNashik News : मंत्रालयावर जाणारा हंडा मोर्चा रोखला; इगतपुरीतील पाणीप्रश्नी बैठक

Nashik News : मंत्रालयावर जाणारा हंडा मोर्चा रोखला; इगतपुरीतील पाणीप्रश्नी बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जलजीवन योजना असूनही नसल्यासारख्या आहेत. या योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार (Corruption) झालेला आहे. याकडे राज्य सरकारचे (State Government) लक्ष वेधण्यासाठी हंडे घेऊन निघालेल्या महिला मोर्चेकऱ्यांना (Women Marchers) अधिकाऱ्यांनी इगतपुरी स्थानकावर (Igatpuri Station) रोखून जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी दिलेले पत्र दिले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेण्याचे स्थगित केले.

- Advertisement -

एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वात काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकडो महिला आंदोलक रिकामे हंडे (Hande) घेऊन मंत्रालयावर धडक देण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकावर (Igatpuri Railway Station) पोहोचले. मात्र, पाणीपुरवठा अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी हेजिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन तेथे मोर्चेकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेत प्रशासनाची भूमिका मांडली. त्याचबरोबर मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रतिनिधींसोबत संवाद साधला. सर्व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व १४ खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आज, मंगळवारी घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.

या बैठकीत पाणीप्रश्नी तोडगा निघाला नाही तर मंत्रालयावर कोणतीही पूर्वसूचना न देता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवान मधे यांनी यावेळी दिला. या मोर्चासाठी सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, कविता पुंजारे, मीना लोणे, धोंडाबाई झुगरे, ममता निंचकर, काळूबाई येले, यमुना लचके, सखुबाई लचके, चंद्रभागा आगिवले, नंदाबाई गोडे, वनिता लोगे, मीना लोणे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित झाल्या होत्या.

दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोहमार्ग पोलीस (Railway Police) निरीक्षक बालाजी शेंडगे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तस्मे, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शेषराम मिना, गोपनिय विभागाचे निलेश देवराज, हेमंत घरटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : पुण्यातील व्यवसायिकाची बिहारमध्ये हत्या, पोलिसांकडून तपास सुरू

0
पुणे । Pune पुण्यातील नामांकित उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे यांची बिहारमध्ये गळा दाबून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ...