Wednesday, April 16, 2025
HomeनाशिकNashik News : झोपडीत राहणारा योगेश सोनवणे चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व; जिल्ह्याच्या...

Nashik News : झोपडीत राहणारा योगेश सोनवणे चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व; जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

आंतरराष्ट्रीय माउंटन सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक | Nashik

घरात अठरा विसे दारिद्र्य.. आई-वडील शेतमजूर.. रहायला छोटीशी झोपडी.. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंतापूर-ताहाराबाद येथील एका आदिवासी कुटुंबातील योगेश नामदेव सोनवणे या १७ वर्षीय विद्यार्थ्याने (Student) अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रांझ आणि सिल्वर अशी दोन्ही पदके मिळवून नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय माउंटन बाइक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये (International Mountain Cycling Competition) १८ वर्षांच्या आतील मुलांच्या गटात निवड होणारा योगेश सोनवणे (Yogesh Sonawane ) हा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे. सायकल फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाना सायकलिंग स्टेट असोसिएशन यांच्या वतीने मोरनी हिल्स (हरियाणा) येथे दि. २८ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान २१ व्या सिनियर, ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांच्या आतील वयोगटामध्ये योगेश सोनवणे या विद्यार्थ्याने अप्रतिम कामगिरी करीत क्रॉस कंट्रीमध्ये ब्रांझ आणि टीम रिलेमध्ये सिल्वर या दोन्ही पदकांवर आपले नाव कोरले.

दरम्यान, या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे एशियन सायकलिंग फेडरेशनच्या वतीने दि.२३ ते २७ एप्रिल दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई माउंटन (बाइक) सायकलिंग स्पर्धेसाठी योगेशची निवड झाली आहे. नुकताच तो चीनला (China) रवाना झाला असून, योगेशला मोठा भाऊ भरत सोनवणे, क्रीडाशिक्षक प्रशांत कुमावत, क्रीडाशिक्षक गणपत आहेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर नितीन नागरे, तुकाराम नवले यांच्यासह आदींकडून त्याला वेळोवेळी आर्थिक मदतही झाली आहे.

मविप्रच्या ताहाराबाद कॉलेजचा विद्यार्थी

योगेश सोनवणे हा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी कला शाखेत शिक्षण घेत आहे. तसेच, नाशिक जिल्हा विनायक कार्य समिती, सटाणा संचलित अंतापूर येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीला असताना योगेशने प्रथमता राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेले आहे.

पदके वाढवताहेत झोपडीची शान

तीन वर्षांमध्ये योगेशने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, शेकडो पदके मिळविली आहेत. २०२४ मध्ये पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या १६ वर्षांच्या आतील स्पर्धेतही योगेशने क्रॉस कंट्री, टाइम ट्रायल, टीम रिले या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले आहे. अत्यंत मेहनतीने पटकावलेली मोलाची पदके, प्रमाणपत्रे सुरक्षितपणे ठेवायलादेखील झोपडीवजा घरामध्ये जागा नसल्याचे दिसून येते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sagarika Ghatge And Zaheer Khan Son : लग्नानंतर ७ वर्षांनी सागरिका...

0
मुंबई । Mumbai भारताचा माजी क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या प्रसिद्ध जोडप्याने नुकताच एका...