नाशिक | Nashik
सातपूर-त्र्यंबक रोडवरील (Satpur-Trimbakeshwar Road) आयटीआय सिग्नलवर (ITI Signal) एका तरुणाने दुचाकी जाळून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा आणि नागरिकांच्या सावधानतेने तरुणाला (Youth) मागे खेचल्याने त्याचा जीव वाचला. यावेळी दुचाकीचा सिग्नलवर भर रस्त्यात मोठा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला होता.
दरम्यान सदर घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीसांनी (Satpur Police) घटनास्थळी दाखल होऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. तसेच अग्निशमन विभागाने तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे सिग्नलवर काही काळ वाहूतक कोंडी झाली होती. तसेच बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती.




