Monday, June 15, 2026
Homeक्राईमNashik Crime : दुर्दैवी घटना! विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Nashik Crime : दुर्दैवी घटना! विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

डांगसौंदाणे | प्रतिनिधी | Dangsaundane

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) केळझर येथे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामादरम्यान विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. प्रवीण राजेंद्र अहिरे (वय ३५, रा. आघार ता. मालेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अशोका वीज कंपनीच्या वतीने केळझर वीज उपकेंद्राजवळ, जिओ मोबाईल टॉवर शेजारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास काम करत असताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने प्रवीण अहिरे यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वीजपुरवठा बंद असतानाही मोबाईल टॉवरचे जनरेटर ऑटो मोडवर सुरू झाल्याने तारांमध्ये विद्युत प्रवाह आला आणि हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत वीज वितरण कंपनी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले. तसेच आर्थिक मदत व न्याय मिळेपर्यंत मृतदेह न उचलण्याची भूमिका घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मध्यस्थीने समन्वय साधत मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात (Satana Rural Hospital) शवविच्छेदनासाठी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, यावेळी प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष गणेश काकुलते यांनीही मृताच्या कुटुंबीयांना आधार देत न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडली. दरम्यान, या कामासाठी कंपनीने अनेक सब-कॉन्ट्रॅक्टर नेमल्याची तसेच काही ठिकाणी अकुशल कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. कामगारांचा अपघाती विमा आहे का, तसेच मोबाईल टॉवरच्या जनरेटरच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. भोये, सूर्यवंशी, सोनवणे करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...